समाजहिताचा उपक्रम : प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
1 min read

समाजहिताचा उपक्रम : प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Loading

 


वाढदिवस साजरा अनोख्या पद्धतीने : रक्तदान शिबिर व किर्तन सोहळ्याचे आयोजन

अमळनेर प्रतिनिधी – पैलाड येथील साळी समाजाचे तसेच श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक माजी नगरसेवक प्रताप छबुलाल साळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने दिनांक शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री भद्रा प्रतीक मॉल, अमळनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी असंख्य तरुण उत्साहाने रक्तदानासाठी पुढे सरसावले असून विशेष म्हणजे प्रताप साळी यांचे सुपुत्र युवा उद्योजक विकी व मॉन्टी साळी स्वतःही रक्तदान करून समाजासाठी आदर्श ठेवणार आहेत.

याच दिवशी रात्री पहिला ड भागातील भवानी मातेच्या नवरात्र महोत्सवात समाज प्रबोधनकार ह.भ.प. विशालजी महाराज बोरनारकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. भक्तिमय किर्तनाचा लाभ घेण्यासाठी आयोजकांकडून सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे युवा उद्योजक विकी व मॉन्टी साळी यांनी केले असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा व समाजहिताचा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *