शालेय जीवनापासून स्वावलंबी बना व ध्येय निश्चित करा*- प्राचार्य नंदकुमार भारंबे
1 min read

शालेय जीवनापासून स्वावलंबी बना व ध्येय निश्चित करा*- प्राचार्य नंदकुमार भारंबे

Loading

* *शालेय जीवनापासून स्वावलंबी बना व ध्येय निश्चित करा*- प्राचार्य नंदकुमार भारंबे

 

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्वावलंबी बनण्याची सवय लावा, स्वतःचे काम स्वतः करा, आपले ध्येय निश्चित करा, नियमित अभ्यास करा असे मत मु. जे.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नंदकुमार भारंबे यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथील शारदोस्तवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफतांना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती कुंभार या विद्यार्थिनीने केले . पाहुण्यांचा परिचय वर्गशिक्षक श्री गोपाळ महाजन यांनी केला. प्रास्ताविक साक्षी चौधरी ने केले. भूपाळी उज्वला कुंभार व मैत्रिणीने केली. तिचे ईशस्तवन डिंपल ठाकरे व तिच्या मैत्रिणी, स्वागत गीत भाग्यश्री कुंभार व तिच्या मैत्रिणी यांनी सादर केले. आभार कुंदना सोनवणेने मानले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका मंगला नारखेडे शुभांगीनी महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *