गिरडच्या न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये ‘चला मैत्री करूया पक्षांशी’ कार्यक्रम संपन्न” विद्यार्थ्यांना पर्यावरण व पक्षी ओळखीचे प्रबोधन – पक्षी मित्र अश्विन पाटील यांचे उद्बोधन
![]()
“गिरडच्या न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये ‘चला मैत्री करूया पक्षांशी’ कार्यक्रम संपन्न”
विद्यार्थ्यांना पर्यावरण व पक्षी ओळखीचे प्रबोधन – पक्षी मित्र अश्विन पाटील यांचे उद्बोधन
भडगाव प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, गिरड येथे आज (२५/०९/२०२५) ‘चला मैत्री करूया पक्षांशी’ हा उद्बोधनपर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे कार्यवाहक प्राध्यापक यु. वाय. पाटील होते. यावेळी प्रा. डी. डी. भोसले, समन्वयक रमेश धनगर, मृणाल धनगर, मुख्याध्यापक सुनिता मनोरे, तसेच दिव्या पाटील, निकिता पाटील, उज्वल पाटील, चैताली धनगर, अश्विनी मनोरे आणि महिला पालक उपस्थित होते.
पक्षी मित्र श्री अश्विन पाटील, अमळनेर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पक्षी आणि निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी स्लाईड्स व व्हिडिओंच्या माध्यमातून पक्षी ओळख, त्यांच्या वैशिष्ट्ये, आवाज, रहिवास आणि पर्यावरणातील स्थान याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले.
सूत्रसंचालन रमेश धनगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन बोरसे यांनी सादर केले.
पक्षी मित्र अश्विन पाटील म्हणाले, “निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. निसर्ग वाचला तरच मनुष्य वाचेल.”


