अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे” आयोजन* * *कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी रविंद्र कांगणे,तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार मा. श्री अरुण म्हात्रे उपस्थित राहणार*
![]()
* *अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती तर्फे राज्यस्तरीय कवी संमेलनाचे” आयोजन*
*
*कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी रविंद्र कांगणे,तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार मा. श्री अरुण म्हात्रे उपस्थित राहणार*
ठाणे:कल्याण: ( मनिलाल शिंपी)वंजारी समाजातील कवींना आपले हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याणचे वतीने रविवार दिनांक ०५ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता सार्वजनिक वाचनालय कल्याण पश्चिम येथे पहिले *राज्यस्तरीय वंजारी कवी संमेलन* आयोजीत करण्यात आले आहे. सदर वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी, गीतकार मा. श्री अरुण म्हात्रे तसेच *कवी संमेलनचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी रविंद्र कांगणे,* नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. सदर वेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बाल साहित्यकार श्री एकनाथ आव्हाड यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी वंजारी समाजातील जास्तीत जास्त कवींनी या कवी संमेलनात सहभाग घ्यावा असे आवाहन अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या साहित्य शाखेचे अध्यक्ष कवी रमेश आव्हाड यांनी केले आहे
कवी संमेलनासाठी दि.३० सप्टेंबर २०२५ पर्यन्त ८१०४५५००८२ या व्हाट्सअप क्रमांकवर आपले पुर्ण नाव व पत्ता, असलेल्या फक्त दोनच स्वालिखित कविता आपले अल्प परिचयासह पाठवून नोंदणी करावयाची आहे
*कवी संमेलनात सहभागी प्रत्येक कवीला प्रमाणपत्र देवून सन्मान केला जाईल*
अधिक माहितीसाठी
*साहित्य शाखा अध्यक्ष* कवि श्री रमेशआव्हाड -मो नं.८७७९८८७५३९ यांचेशी संपर्क साधावा असे समितीचे सरचिटणीस अर्जुन डोमाडे यांनी कळविले आहे.

