स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.*
1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकावले विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद.*

जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने क्रीडा युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तर १७वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बी.वाय.के.कनिष्ठ महाविद्यालयाचा १- ०असा पराभव करीत मोठ्या दिमाखात अजिंक्यपद मिळवीत दि.२३ते २५सप्टेंबर दरम्यान यवतमाळ येथे होणाऱ्या राज्यस्तर स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
अर्शिया आरिफ तडवीच्या नेतृत्वाखालील विजयी संघात संस्कृती सचिन बोरसे, संपदा मनीष कुलकर्णी, पूर्वा तुषार गवादे, श्रद्धा धनराज पाटील,
अद्विका अभिषेक सिंग, स्वाती रामबहादुर गुप्ता,
विना धनराज गुळवे,इशा लीलाधर पुनिया, दिव्या विकास मोरे, गौरी राजेश पिंगळे, दिव्या विशाल लिंगायत, आयुषी सुनील कुलकर्णी यांचा समावेश होता. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या संघाचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्री. आर.बी.ठाकरे,पर्यवेक्षिका प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे,समन्वयक प्रा.श्री.उमेश पाटील, जिमखाना समिती प्रमुख प्रा.सौ.शोभना कावळे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *