शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार
![]()
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दिनांक 24 सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार
जळगाव – नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे या वर्षासाठी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले.23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी जळगाव शहरातील अग्रगण्य शिक्षण संस्था नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर सेमिनार 24 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळात नोबेल फाउंडेशन प्रगती विद्यामंदिर समोर दुसरा मजला या ठिकाणी करण्यात आले आहे. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा तज्ञ जयदीप पाटील तसेच टीईटी उत्तीर्ण राकेश पवार , यशवर्धिनीचे संचालक अक्षय देवरे मार्गदर्शन करणार आहेत.तरी यासाठी अधिकाधिक डीएड व बीएड धारकांनी या सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती तसेच नाव नोंदणीसाठी 91755 48089 या क्रमांकावर संपर्क साधावा

