एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप
![]()
एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांना रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे सकस आहार वाटप
अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला.
आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकल पालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन किट दाते धनश्री मेडिकल चे संचालक सचिनभाऊ जैन यांनी त्यांच्या वडिलांचे स्मृती प्रित्यर्थ ३० प्रोटीन किट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक देशमुख होते. व या महिन्यातील सकस आहार किट आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ३० किराणा कीटचे वाटप करण्यात आले .
हा कार्यक्रम मागील 6 वर्षापासुन सलग सुरू आहे. यात दर महिन्याला ह्या मुलांना हे किट देण्यात येते.
आजच्या कार्यक्रमांचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे प्रतिक जैन यांनी केले आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ भारती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.मुलांशी आरोग्य विषयक संवाद साधत दाते व रोटरी क्लब आणि आधार संस्थाने सर्व मुलांना किराणा किट उपलब्ध करून दिले .
त्यांनी आपल्या मनोगतातून आज इतक्या मुलांपर्यंत पोहोचल्याने मदत केल्याचे खरे समाधान मिळत आहे.
विवेक देशमुख यांचे दात्याना आवाहन
मुलांना दर महिन्याला प्रोटीन किट व सकस आहार वाटणे गरजेचे असल्याने दात्यांनी या कार्यक्रमाशी जुडावे व गरजू मुलांपर्यंत आपली मोलाची मदत पोहोचवावी, असे आवाहन विवेक देशमुख यांनी केले. आधार संस्थेचे कार्यकारी संचालक रेणु प्रसाद व रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष सनीभाऊ कोठारी व रोटरी क्लबचे सेक्रेटरी अशिषभाऊ चौधरी व रोटरी क्लबचे जेष्ठ सदस्य चेलाराम सैनानी तसेच रोटरीयन प्रतिक जैन , वृषभ पारेख, देवेंद्र कोठारी, रोहित सिंघवी, पुनम कोचर ,राजेश जैन कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी सुर्यवंशी पुनम पाटील, दिपक विश्वेश्वर यांनी प्रयत्न केले व कार्यक्रमांचे सुत्र संचालन संजय कापडे यांनी केले.

