डोंबिवली भारत स्काऊट गाईड्स संस्था व रोटरी क्लब डोंबिवली तर्फे वृक्षदिंडी चे आयोजन.
![]()
डोंबिवली भारत स्काऊट गाईड्स संस्था व रोटरी क्लब डोंबिवली तर्फे वृक्षदिंडी चे आयोजन.
डोंबिवली पारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेने वृक्षदिंडी,रक्षाबंधन , स्कार्फ डे असा त्रिवेणी संगम स्काऊट गाईड विषयाचे संस्कारक्षम जीवनाचे दर्शन घडवले.: दिनेश खरोटे.
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईडस् स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी, रक्षाबंधन व स्कार्फ डे कार्यक्रमाचे आयोजन सुरेश महाजन मॅनेजिंग ट्रस्टी ध.ना.चौधरी बहुउद्देशीय संस्था डोंबिवली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग चे अध्यक्ष रो.दिलीप अष्टेकर, सचिव रो. दिनेश खरोटे,खजिनदार गजानन भाग्यवंत, रोट्रियन महेंद्र भोईर,रोट्रियन अवधेश उपाध्याय डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप ,सचिव जगदीश उगले डोंबिवली भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष एकनाथ चौधरी सल्लागार नरेंद्र राणे, राजेंद्र शेटे, प्रकल्प प्रमुख श्री.चंद्रकांत बरकडे
मुख्याध्यापक ध. ना.चौधरी बहुउद्देशीय विद्यालय, पर्यवेक्षक श्री भूषण संखे,श्री दळवी सर ध. ना.चौधरी बहुउद्देशीय विद्यालय यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या शुभ कार्या प्रसंगी उपस्थित शाळेचे स्काऊट मास्टर श्री हरित मेहता,श्री शेखर पाटील, श्री शंकर महाजन,श्री गणेश राठोड,श्री प्रशांत पाटील ,श्री मंदार नेकर,,एस के पाटील,गाईड कॅप्टन सौ सरिता तिवारी,पार्वती अय्यर,सौ निर्मला बागल, विना नायडू,कल्पना जैसवार,नयना वाणी,आकांक्षा नाईक,सौ. लीना शिंपी सर्व उपस्थित होते.
त्यानंतर स्काऊट गाईड प्रार्थना घेण्यात आली.नंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्प गुच्छ सन्मानचिन्ह व स्कार्फ देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली ची विद्यार्थिनी कुमारी अमृता नायर हिस राष्ट्रपती प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर रोटरीयन प्रकाश शहा यांनी उपस्थित सर्व स्काऊट गाईड यांना जीवनामध्ये शिस्त किती महत्वाची आहे हे पटवून दिले.
रोटरीयन अध्यक्ष दिलीप अष्टेकर सरांनी स्काऊट गाईड चे जीवनात काय महत्व आहे त्याबद्दल सांगितले. त्यानंतर डी. एन. सी.विद्यालययाचे मुख्याध्यापक चंद्रकांत बरकडे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर राष्ट्रपती पदक विजेती अमृता नायर हिने आपले मनोगत व्यक्त करताना जीवनामध्ये शिक्षक आणि आई वडिलांचे स्थान किती महत्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळे आज मला दिल्लीला राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचता आले. हे सांगत असताना तिला अश्रू अनावर झाले.
उपस्थित 13 शाळेच्या 5 स्काऊट व गाईड यांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागातर्फे स्कार्फ देऊन जागतिक” स्कार्फ डे” साजरा करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना सर्व शाळांच्या गाईड कॅप्टन यांनी राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
तसेच सर्व शाळेच्या उपस्थित गाईड यांनी उपस्थित सर्व स्काऊट यांना राखी बांधली व स्काऊट यांनी गाईड यांना चॉकलेट, कॅटबरीच्या स्वरूपामध्ये भेट दिली असा अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
त्यानंतर उपस्थित सर्व स्काऊट गाईड यांना रोटरी क्लब तर्फे अल्पोपहार देण्यात आला.
वृक्षदिंडी कार्यक्रम
वृक्षदिंडी कार्यक्रमासाठी 13 शाळेच्या जवळ जवळ 180 विद्यार्थी व 30 स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन यांनी सहभाग घेतला होता.
वृक्षदिंडीची सुरुवात डी एन सी विद्यालय डोंबिवली पूर्व इथून करण्यात आली व शिवमंदिर रोड चौकातून परत प्रगती कॉलेज मार्गे डी एन सी विद्यालय इथे समारोप करण्यात आला. वृक्षदिंडी साठी रामनगर पोलिस स्टेशन इथून 3 पोलिस कर्मचारी बंदोबस्त साठी देण्यात आल्यामुळे वृक्षदिंडी सुखरूप आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहचली.
वृक्षारोपण कार्यक्रम
सर्व कार्यक्रम झाल्यानंतर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली चे पदाधिकारी तसेच डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थेचे पदाधिकारी , डी एन सी विद्यालय डोंबिवली चे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री एकनाथ चौधरी सर व सचिव श्री जगदीश उगले यांनी केले .प्रास्ताविक अशोक जगताप यांनी केले . स्थानिक संस्थेचे सल्लागार राणे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान स्काऊट क्लप घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले.
आजच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेहमीप्रमाणे सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांनी खूप मेहनत घेतली
पुन्हा एकदा सर्व शाळांचे मुख्याध्यापक, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. इथून पुढे असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा डोंबिवली भारत स्काऊटस् आणि गाईड्स स्थानिक संस्थचे सचिव जगदीश उगले यांनी व्यक्त केली आहे.

