नंदादीप विद्यालयास दामिनी पथकाची भेट —
![]()
नंदादीप विद्यालयास दामिनी पथकाची भेट —
अमळनेर प्रतिनिधी
आज रोजी विद्यालयात मारवड पोलीस स्टेशन मधील दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार रेखा ईशी व महिला पोलीस माधुरी शिरसाठ आणि पोलीस कर्मचारी परवेझ शेख यांनी भेट दिली, तसेच विद्यालयातील मुलींना महिला सुरक्षा बाबत सुचना दिल्या,तसेच विद्यालयातील CCTV CAMPUS बाबत आनंद व आश्चर्य व्यक्त केले. विद्यालयातरफे नॅपकिन, पुस्तक व फुल गुच्छ देउन सत्कार करण्यात आला.रेखा ईशी मॅडम यांचा सत्कार इ. 10 वी ची विद्याथिनी ज्ञानेश्वरी पाटील तर माधुरी शिरसाठ मॅडम यांचा सत्कार मोहिनी बिर्हाडे यांनी केला, विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब ऐ बी चौधरी यांनी परवेज शेख सर यांचा सत्कार केला दामिनी पथक प्रमुख ईशी मॅडम व शिरसाठ मॅडम यांनी सर्व मुली, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. सर्व मुली, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते..सूत्रसंचालन इंग्लिश शिक्षक श्री.ए.जी. पाटील यांनी केले.

