स्वस्थ नारी ,सशक्त परिवार अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी*
![]()
*स्वस्थ नारी ,सशक्त परिवार अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी*
अमळनेर प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण रुग्णालयात वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 सुरू असलेल्या राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनातून बदल घडवण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर दिला जात आहे.
या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय अमळनेर या ठिकाणी अभियान 18 सप्टेंबर रोजी राबवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जळगाव लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ उपस्थित होते. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर ,राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कार्यरत होते .
खासदार स्मिताताई वाघ यांनी समाजकार्य महाविद्यालय हे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात असे सांगून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
स्वयंसेवक विद्यार्थी सागर कोळी, धिमा राऊत ,उत्कर्षा पवार, हिना, किरण पिंपळे सहभागी झाले होते.

