नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे,  अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ
1 min read

नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे, अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ

Loading

नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे

अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ

अमळनेर प्रतिनिधी
नाटक हे जगायला शिकवते असे मत रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. परिवर्तन जळगाव व अमळनेर महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी तीन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन अमळनेर शहरातील टाऊन हॉल येथे करण्यात आलेले आहे. अभिनेत्री मंजुषा भिडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी महिला मंचाच्या अध्यक्ष डॉ अपर्णा मुठे, नितीन शहा, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे हर्षल पाटील, अक्षय नेहे उपस्थित होते. तीन दिवसीय नाट्य कार्यशाळेत नाटक म्हणजे काय, शरीर , मन, बुद्धी, चेतना यांच्या संयोगाने अभिनय कसा करता येतो, अभिनय करताना घ्यावयाची काळजी अशा अनेक गोष्टी प्रात्यक्षिकासह कार्यशाळेत जाणून घेण्यात आल्या. उद्घाटनानंतर शरीराची ओळख व शारीरिक कसरती तसेच श्वसनाचे व्यायाम, योगाचे प्रकार, प्राणायामाचे प्रकार त्याचा फायदा व अभिनयात याचा होणारा उपयोग याविषयी मंजुषा भिडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अभिनय करून भूमिकेत कसे शिरावे , अभिनय कसा करावा हे सर्व शिबिरार्थींना करून दाखवले. यानंतर शिबिरार्थींनी उत्स्फूर्त नाट्य प्रवेशाद्वारे आपली कला सादर करून दाखवली. शिबिरार्थीं मध्ये उत्साहाचे वातावरण होते. एकूण शिबिराविषयीची ओढ, अभिनयाविषयी असलेली तळमळ शिबिरार्थीं मध्ये प्रकर्षाने जाणवली. उद्या शुक्रवारी टीव्ही व नाट्य अभिनेते हर्षल पाटील व अक्षय नेहे हे ध्वनी नियंत्रण आरोह, अवरोह, शरीर व आवाजाचा ताल यांचा समतोल याविषयी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिर प्रमुख वसुंधरा लांडगे यांनी केले. याप्रसंगी महिला मंचच्या सचिव सरोज भंडारकर , कोषाध्यक्ष कांचन शहा, करुणा सोनार, पद्मजा पाटील, माधुरी पाटील उपस्थित होत्या. नाट्य शिबिरासाठी पूज्य साने गुरुजी वाचनालयाचे सहकार्य लाभलेले आहे.

One thought on “नाटक जगायला शिकवते – रंगकर्मी मंजुषा भिडे, अमळनेर नाट्य कार्यशाळेला प्रारंभ

  1. अतिशय सुंदर उपक्रम! 🌹🌹🌹🫡🫡🫡

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *