राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल*
![]()
*राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत ‘प्रताप’ चा संघ अव्वल* :
——————————————–
●पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय प्रश्न
मंजुषा स्पर्धा 15 व 16 सप्टेंबर रोजी
संपन्न
● करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप
कॉलेज व रुसा यांचा संयुक्त उपक्रम
● 28 विविध महाविद्यालयातील संघांनी
घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग
● स्पर्धेचे १० वर्ष
————————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर या ठिकाणी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष, करिअर कौन्सिलिंग सेंटर यांच्यावतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन दिनांक 15 व 16 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले.यावेळी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील संघाने उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.यावेळी एकूण 30 महाविद्यालयाने आपल्या नावाची नोंदणी केली; परंतु 28 महाविद्यालयातील संघ प्रत्यक्षात उपस्थित होते.
यामध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद, जिल्हा नांदेड, एस एस व्ही पी एस महाविद्यालय,धुळे, पी ओ नहाटा महाविद्यालय, भुसावळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, भौतिकशास्त्र प्रशाला, जळगाव, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव,जी.टी.पी महाविद्यालय, नंदुरबार, सिताराम गोविंद पाटील महाविद्यालय,साक्री, दादासाहेब दिगंबरराव पाटील महाविद्यालय, एरंडोल असे विविध 28 संघ प्रस्तुत स्पर्धेसाठी सहभागी होते. या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात प्रताप कॉलेजचे माजी विद्यार्थी, सध्या अमरावती शहराचे एपीआय अमरसिंग वसावे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली, यावेळी राज्यशास्त्र विभागाचे डॉ.हर्ष नेतकर यांच्या समवेत राजनंदिनी यादव व अन्य जणांनी मधुर गीतांनी उपस्थित सर्व अतिथींचे स्वागत केले . यानंतर *माता सरस्वती देवी, दानशूर कर्मयोगी-श्रीमंत प्रताप शेठजी, पूज्य साने गुरुजी*-यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विजय तुटे यांनी केले तर उपस्थित उद्घाटक व प्रमुख अतिथी यांचा परिचय *प्रा.वृषाली वाकडे* यांनी करून दिला. यावेळी डॉ.विजय तुंटे,डॉ.माधव वाघमारे लिखित ‘ *भारताचे संविधान’ व ‘आधुनिक भारतीय राजकीय विचार*’ या दोन पुस्तकांचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमात पीएच.डी पदवी मिळाल्यामुळे *डॉ.ज्ञानेश्वर दत्तात्रय कांबळे* यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव क्राईम ब्रँच पीएसआय मुस्तफा मिर्झा(कोण बनेगा मराठी करोडपती विजेता)हे उपस्थित होते.
या उद्घाटनपर समारंभात उद्घाटक *एपीआय अमरसिंग वसावे* यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की,माझे जीवन स्पर्धा परीक्षामुळे घडले, यासाठी योग्य मार्गदर्शन व नियोजन आवश्यक आहे.करिअर कौन्सेलिंग सेंटरच्या विविध उपक्रमामुळे माझी ज्ञानाची भूक भागली म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेत प्रश्नांचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे तसेच याप्रसंगी दुसऱ्या अतिथी *पीएसआय मुस्तफा मिर्झा* म्हणाले की, आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे,सर्व प्रश्नांचे स्वरूप बदलले आहे तसेच 360 डिग्री मध्ये स्पर्धा बदलली आहे म्हणून प्रत्येकानी आपली निर्णय व आकलन क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे.याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घडाळीकडे पाहू नका,संघर्ष करा. ‘संघर्ष’ मोठे होण्याचे एक कारण आहे, याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे *कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल* यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे सर्व विद्यार्थ्यांना अंतर विद्याशाखीय व बहुविद्याशाखीय अभ्यास करण्याची आणि नवीन विषय हाताळण्याची संधी प्राप्त झाली आहे म्हणून आपण अधिक सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रयत्न करावेत.
याप्रसंगी जेष्ठ संचालक, प्रसिद्ध सर्जन *डॉ.अनिल शिंदे* म्हणाले की,अमळनेर भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे म्हणून आपण या भूमीत आलात आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करीत आहात त्यामुळे भारतीय परंपरेत ‘ज्ञानास’ प्राधान्य देण्याचा प्रयत्न आढळतो.
संघ भावना लक्षात घेऊन सर्वांनी स्पर्धेत चांगल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तर द्यावेत आणि जो कोणी स्पर्धा परीक्षेत यशस्वी मार्गक्रमण करेल त्यांच्याकडे चिकाटीपणा,शिस्त, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम असणे आवश्यक आहे. यावेळी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये एक लाखाचे बक्षीस डॉ.अनिल शिंदे,प्रत्येकी 50 हजारांचे बक्षीस डॉ.एस ओ माळी व डॉ.धीरज वैष्णव यांच्याकडून दिले जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
उद्घाटन समारंभात उपस्थित सर्व स्पर्धाकांना यावेळी महाविद्यालयाचे *प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव* यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचावर खानदेश शिक्षण मंडळाचे *उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरीताई पाटील तसेच संस्थेचे चिटणीस प्रा.पराग पाटील, महाविद्यालयीन शिक्षक प्रतिनिधी प्रा. दिनेश भलकार*,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे,करियर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, प्रश्न मंजुषा स्पर्धेचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर मराठे, संयोजीका प्रा.वैशाली राठोड यांच्यासह आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य,विविध महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक तसेच बहुसंख्येने विद्यार्थी देखील उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.नलिनी पाटील यांनी केले तर आभार संयोजीका प्रा. वैशाली राठोड यांनी मानले.
दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे दुसरी व तिसरी (उपांत्य व अंतिम फेरी) संपन्न झाली.यावेळी पहिल्या फेरीमध्ये एकूण 28 संघा पैकी 15 संघाची निवड करण्यात आली आणि ते 15 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले, त्यांची उपांत्य फेरीतून अंतिम फेरीमध्ये पाच संघाची निवड करण्यात आली आणि त्या पाचही संघाला स्पर्धा परीक्षा संचलन समितीने प्रश्न विचारले.
*स्पर्धेचे परीक्षक*
१.डॉ.नलिनी पाटील
२.प्रा.वैशाली राठोड
३.प्रा.वृषाली वाकडे
४.डॉ.वंदना भामरे
५.प्रा.वैशाली महाजन
दुपारी तीन वाजता राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे समारोप व बक्षीस वितरण पार पडले.यावेळी समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे *पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय विनायकराव कोते साहेब* उपस्थित होते.त्याचप्रमाणे *लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, कोषाध्यक्ष नितीनजी विंचुरकर, लायन्स क्लब सीनियर बोर्ड मेंबर डॉ.युसूफ पठाण, डॉ. रवींद्र जैन, डॉ. विनोद जैन,विनोद अग्रवाल,डॉ. मिलिंद नवसारीकर,मा.प्रशांत सिंघवी, मा. दिलीपजी गांधी, मा. प्रसन्न शहा,लायन्स क्लबचे सदस्य आणि खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक प्रदीप अग्रवाल* हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी मंचावर अतिथी म्हणून प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य, संस्थेचे माजी चिटणीस *डॉ.एस ओ माळी* हे देखील उपस्थित होते
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.माळी सर यांनी स्पर्धा परीक्षेत आपण कसे घडले पाहिजे ? विविध संदर्भ कसे वाचले पाहिजे ? परिश्रम, प्रयत्न, नियोजन व व्यवस्थापन यासंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी विनायकरावजी कोते यांनी देखील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केल. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रदीपजी अग्रवाल उपस्थित होते, याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.जाधव यांनी देखील मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तुत समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख दोन्ही अतिथींचा परिचय *डॉ.जितेंद्र बी पाटील* यांनी करून दिला. याप्रसंगी दोन राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत दोन दिवसात आलेले अनुभव कथन करताना एस पी डी एम कॉलेज शिरपूरची विद्यार्थिनी *प्रियंका पाटील* आणि जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथील *गायत्री आमले* यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले.याप्रसंगी संघ व्यवस्थापक म्हणून पी बी बागल महाविद्यालय, दोंडाईचा येथील *प्रा. यादव बोयेवार* आणि किसान महाविद्यालय,पारोळा येथील *प्रा.डॉ.शशिकांत पाटील* या दोघांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.*लायन्स क्लब तर्फे नितीनजी विंचुरकर,डॉ.मिलिंद नवसारीकर* यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समारोप बक्षीस वितरण प्रसंगी *प्रा.वृषाली वाकडे यांनी सूत्रसंचालन केले* तर दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांची नावे गणित विभाग प्रमुख *डॉ.नलिनी पाटील* यांनी जाहीर केले
*राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते*
१. *प्रथम*- प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर
(रुपये-१०,००० डॉ.एस ओ
माळी व परिवार तर्फे)
*विद्यार्थी*-आफ्रिन पठाण,
उमेश कुंभार
२. द्वितीय- एस पी डी एम महाविद्यालय, शिरपूर
(रुपये-७,००० लायन्स
क्लब,अमळनेर तर्फे)
*विद्यार्थी*- उमेश वळवी,
प्रियंका पाटील
३. तृतीय- पंडित जवाहरलाल नेहरू एम एस डब्ल्यू महाविद्यालय, अमळनेर
(रुपये ५००० स्व.गोविंददादा मुंदडे
यांच्या स्मरणार्थ राकेश मुंदडे, पंकज
मुंदडे,चिराग मुंदडे परिवार तर्फे)
*विद्यार्थी*- विशाल पाटील
चैताली पाटील
४. उत्तेजनार्थ पहिले-
नवलभाऊ बीएड महाविद्यालय,
अमळनेर
*विद्यार्थी* – मयूर पाटील
योगेश पाटील
५. उत्तेजनार्थ दुसरे-
जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय,
जळगाव
(स्व.रसिकलाल गुजराथी यांच्या
स्मरणार्थ दोन्ही उत्तेजनार्थ बक्षीस
प्रा.जयेश गुजराथी यांच्या तर्फे)
*विद्यार्थी* – गायत्री आमले
लालन डोळसे
दोन दिवसीय स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकूर,डॉ.रवी बाळसकर,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ किरण गावित,डॉ अनिल झळके, डॉ.ज्ञानेश्वर मराठे आदींनी प्रश्न विचारले.
यावेळी उपस्थित विजेत्यांना रोख रक्कमे शिवाय आकर्षक चषक व प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करण्यात आले,विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथीच्या हस्ते गौरविण्यात आले आणि त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. *प्रस्तुत समारोप कार्यक्रमाचे आभार संयोजक डॉ.ज्ञानेश्वर मराठे* यांनी मानले तर सर्वात शेवटी कार्यक्रमाची *सांगता राष्ट्रगीताने वायोलिनद्वारे डॉ.हर्ष नेतकर यांनी केले*
प्रस्तुत दोन दिवसीय कार्यक्रमास *सिनेट सदस्य डॉ.धिरज वैष्णव, डॉ.संदीप नेरकर*, उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील, डॉ.योगेश तोरवणे, रेक्टर डॉ.अमित पाटील,डॉ.धनंजय चौधरी, डॉ.किरण गावित,डॉ.रवी बाळसकर,डॉ.आर सी सरवदे,डॉ.माधव भुसनर, डॉ.बालाजी कांबळे,डॉ.अनिल झळके,डॉ.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित, ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.विजय साळुंखे, प्रा.रोहन गायकवाड,डॉ.प्रमोद चौधरी,प्रा.जयेश साळवे, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.एस.डी बागुल, डॉ.मुकेश भोळे,डॉ.विवेक बडगुजर,प्रा.रामदास सुरळकर, प्रा.हर्षल सराफ,अर्थशास्त्र विभागाचे प्रा.सचिन आवटे,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.सुनिल सपकाळे,प्रा.भिका पावरा, प्रा.हिमांशू गोसावी,राज्यशास्त्र विभागाचे डॉ.राखी घरटे,डॉ.प्रदिप पवार,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,पदार्थ विज्ञान विभागाचे प्रा.आकाश चौधरी, प्रा.संदीप नेरकर,प्रा.उन्मेष पाटील,इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा वृषाली वाकडे,प्रा.कल्याणी पाटील ,प्रा.अमोल अहिरे,प्रा.दिपाली सातपुते,पंकज भदाणे,मोहिनी पाटील,चैताली पाटील, भूगोल विभागाचे डॉ.किरण गावित,चंद्रशेखर वाडे,करिअर कौंसेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ,पराग रवींद्र पाटील,विशाल अहिरे,अतुल धनगर, दितेश चिंचोरे,नंदूसिंग पाटील,तुषार पाटील,योगेश चिंचोरे,धिरज चौधरी याचप्रमाणे तंत्रज्ञान सहाय्यक दिपक चौधरी, पदार्थ विज्ञान विभागाचे विश्वास पाटील,पवन शर्मा,अंबादास चावरीया ,मुख्य शिक्षकेतर वर्ग प्रमुख जयदेव पाटील यांच्यासह कुलसचिव राकेश निळे,देवेंद्र कांबळे,भटू चौधरी,योगेश चौधरी, वसतिगृहातील जितेंद्र रायसिंग,अफजल पठाण,प्रवीण डांबेलकर,प्रसाद चौधरी, सुरेश सोनवणे,कविता चौधरी आदींनी विशेष सहकार्य केले.

