कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश 
1 min read

कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश 

Loading

कोंढावळ ग्रामसभेत सामूहिक सहभागातून स्वच्छतेचा आणि हरिततेचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी :(जगदीश पाटील सर मराठी लाईव्ह न्युज प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोंढावळ येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सर, सरपंच डॉ. भूषण पाटील, वि.का.सो. चेअरमन प्रल्हाद पाटील, उपसरपंच सविता पाटील, पूजा पाटील, ग्रामसेवक धनगर मॅडम, रवींद्र पाटील, किशोर पाटील, अशोक पाटील तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला मंडळ, शेतकरी गट, महिला बचत गट, सीआरपी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कृषी सखी, क्रीडा व मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक बाळ गोपाळ आदींसह गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

ग्रामसभेनंतर सर्वांनी मिळून गावात मिरवणूक काढून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा चोपडाई कोंढावळ व कोंढावळ शिवारात सामूहिक वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्पही ग्रामस्थांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *