कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
1 min read

कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

Loading

कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

ठाणे:कल्याण: (मनिलाल शिंपी ) नुकताच खान्देश कुंभार समाज, कल्याण संस्थेचा स्नेह मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ सन २०२५, आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. सतिष दादा दरेकर (संस्थापक अध्यक्ष,कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश),मा.श्री. रमाकांत क्षिरसागर (प्रदेश अध्यक्ष, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश),मा.श्री.सुरेश बहाळकर (संस्थापक अध्यक्ष धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज,विकास व शैक्षणिक संस्था),सौ.रसिका खेडकर,महिला प्रदेश अध्यक्षा,श्री.यशवंत जगदाळे.डॉ. सुरेशकाळे.श्री. नंदु वाघ,संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश मोरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.देवानंद चव्हाण,महेश सायकर,जगदीश मोरे,सोमनाथ सोनवणे,भगवान सूर्यवंशी,सविता जगदाळे,सतीश एलमकर,भास्कर कल्याणकर,तुळशीराम मोरे, वसंत कुंभार, सोमनाथ सोनवणे,गणेशआहेर,गुलाबराव सोनवणे इ.मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रम सिध्दी विनायक हॉल, भोईरवाडी, कल्याण (प.)येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी,उद्योगरत्न पुरस्कार,सेवापूर्ती पुरस्कार व पदोन्नती मिळणाऱ्या समाज बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रमुख पाहुणे श्री.सतिश दादा दरेकर यांनी समाज संघटित झाल्यास येणाऱ्या पिढीस कसा उपयुक्त होईल व संघटित समाज आपल्या मागण्या सरकार पर्यंत नेईल.महिला सक्षमीकरण, जनगणना करणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाज संस्थेचे श्री.संजीव सोनवणे,बाळासाहेब म्हस्के,प्रकाश बोरसे,मधुकर कुंभार,रंगराव मोरे,कैलास बच्छाव, अर्जुन बोरसे,मुकेश जगदाळे,नारायण महाले, नरेंद्र मोरे,अशोक वाघ,जगदीश मोरे,प्रकाश कुंभार,विकास मोरे,शैलेश चव्हाण,विजय मोरे,योगेश मोरे,विलास मोरे,उमेश कुंभार,प्रमोद कुंभार,यश मोरे,रुपम पगारे,आत्माराम सोनवणे,सुनील मोरे,अनिल मोरे,अनिल जगदाळे,राजाराम बच्छाव,एकनाथ महाले, संतोष महाले,रघुनाथ महाले,भीमराव मोरे,कैलास वाघ,आंनदा कुंभार,योगेश मोरे,संजू सोनवणे,कुणाल मोरे,राजेंद्र बोरसे,प्रवीण बोरसे,सौरभ चव्हाण,गुलाब वाघ,बंटी मोरे,भावेश मोरे इ.सभासद तसेच पालघर येथून ,ठाणे,नाशिक व महाराष्ट्र कुंभार प्रदेश कार्यकारिणीचे अनेक सदस्य उपस्थित होते.तसेच समाजातील महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमास समाजातील सर्व बंधू भागिनी व पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *