व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
1 min read

व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Loading

व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुड क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

अमळनेर प्रतिनिधी

शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025 अंतर्गत अमळनेर येथे नुकत्याच झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरुडच्या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उत्तम कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले. वयगट 14 व 17 मधील विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये आपले कौशल्य सादर करून तालुकास्तरावर बहुमोल क्रमांक पटकावले.
या स्पर्धेत चि. भूषण सुरेश सुतार (1500 मीटर धावणे, तृतीय), चि. दर्शन शरद पाटील (600 मीटर धावणे, तृतीय व 800 मीटर धावणे, द्वितीय), चि. लोकेश नितीन पाटील (गोळाफेक व 200 मीटर धावणे, द्वितीय), चि. किरण रवींद्र पाटील (200 मीटर धावणे, तृतीय), चि. साईल वसंत पाटील (लांब उडी, द्वितीय), चि. कृष्णा हेमंत पाटील (ट्रिपल जंप, द्वितीय) व चि. जयेश सुनील पाटील (धावणे, द्वितीय) यांनी आपापल्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शाळेचे नाव तालुक्यात उज्ज्वल केले आहे.

या सर्व विजयी विद्यार्थ्यांची पुढील जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांसाठी निवड करण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🎉 कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मा. जिल्हा परिषद सदस्या ताईसौ. जयश्री अनिल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्थानिक शाळा समिती अध्यक्षा सौ. पुष्पलता अशोक पाटील, शालेय समिती, पालक-शिक्षक समिती, मुख्याध्यापक श्री. अनिल एस. सूर्यवंशी सर, क्रीडा प्रमुख तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेचा उत्तम क्रीडा परंपरेवरील भर यामुळे हे यश शक्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *