सामाजिक कार्याबद्दल मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
![]()
सामाजिक कार्याबद्दल विक्रांत पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील समस्त लाडशाखीय वाणी समाज पंच मंडळ, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “गुण गौरव सत्कार सोहळा” कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
पाटील यांनी विविध सामाजिक बांधिलकी जपत उपेक्षित व तळागाळातील लोकांच्या जीवनात आधार व प्रेरणा निर्माण केली आहे. कोणताही सामाजिक, शैक्षणिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यांनी नेहमीच स्वतःला त्यात वाहून घेतले आहे. उपेक्षितांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप ठेवणे, मदतीसाठी सदैव कटिबद्ध राहणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे.
या उत्कृष्ट कार्याची दखल घेत विद्यमान आमदार तथा माजी मंत्री अनिलदादा पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष सौ. जयश्रीताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, तसेच वाणी समाजातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पाटील दांपत्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजकार्यातील त्यांचा सहभाग भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.

