शिवसेना सभासद नोंदणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह, पक्ष बळकटीसाठी निर्धार-शिवसेनाप्रमुख सुरेश पाटील
1 min read

शिवसेना सभासद नोंदणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह, पक्ष बळकटीसाठी निर्धार-शिवसेनाप्रमुख सुरेश पाटील

Loading

शिवसेना सभासद नोंदणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह, पक्ष बळकटीसाठी निर्धार-शिवसेनाप्रमुख सुरेश पाटील

अमळनेर प्रतिनिधी
शिवसेना हा सर्वसामान्य कष्टकरी व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, शेवटच्या घटकाला न्याय देणे हेच खरे शिवसेनेचे ध्येय आहे. त्यामुळे सभासद नोंदणी मोहिमेतून प्रत्येक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन पक्ष बळकट करावा, असे आवाहन तालुका प्रमुख सुरेश पाटील यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर प्रमुख संजय पाटील होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश देशमुख, महिला तालुका प्रमुख सुरेखा पाटील, महिला शहर प्रमुख चित्रकला महाजन यांनी मनोगत व्यक्त करत पक्षशक्ती वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस युवा सेना तालुका प्रमुख गुणवंत पाटील, उपतालुका प्रमुख सुभाष पाटील, भूषण कोळी, संतोष पाटील, महेश पाटील, विनोद बोरसे, सोमेश्वर पाटील, उपशहर प्रमुख शिवदास पाटील, व्यापारी आघाडी प्रमुख अमित जैन, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख शोएब शेख, प्रसिद्धी प्रमुख अनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच रविंद्र पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, ऋषिकेश पाटील, राजेंद्र पाटील, दीपक हटवाल, गजेंद्र राठोड, रामेश्वर, लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील, संतोष महाजन, अरुण महाजन, आधार कोळी, रिजवान खान यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान “एकच ध्यास, शिवसेना खास!”, “जय महाराष्ट्र!” अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. कार्यकर्त्यांच्या जोशात पक्षशक्ती वाढविण्याचा दृढ निर्धार दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *