हिंदी निबंध स्पर्धेत अमळनेरच्या कन्या शाळेचा यशाचा झेंडा
![]()
हिंदी निबंध स्पर्धेत अमळनेरच्या कन्या शाळेचा यशाचा झेंडा
अमळनेर प्रतिनिधी
हिंदी राष्ट्रभाषा सभा धुळे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत अमळनेरच्या श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी यशाची घोडदौड केली.
या परीक्षेत हेतल कैलास बाविस्कर हिने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक, तर कामाक्षी गोरखनाथ चौधरी हिने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा गौरव वाढविला. या दोन्ही विद्यार्थिनींना शाळेच्या हिंदी विषय शिक्षिका श्रीमती योगेश्री मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन केले.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमधून घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर तसेच पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ यांनी विद्यार्थिनींचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

