राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये शुभम डापके यास रौप्यपदक :*
![]()
*राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये शुभम डापके यास रौप्यपदक :*
जळगांव प्रतिनिधी
प्रियदर्शनी पार्क स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्याचा खेळाडू शुभम डापके याने ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये रौप्यपदक पटकावले या इव्हेंटमध्ये पुण्याच्या धुलादेव घागरे याने 9:07.36 वेळ देत सुवर्णपदक, *जळगावचा शुभम डापके याने 9:14.14 वेळ देत रौप्यपदक* तर नागपूरचा प्रणय माहुले याने 9:18.38 वेळ देत कांस्यपदक पटकावले. शुभम याचे या यशाबद्दल केंद्रीय राज्य क्रीडा मंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार श्री.राजुमामा भोळे, आमदार प्रा.श्री.चंद्रकांत सोनवणे ,जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक, मनपा क्रीडा अधिकारी श्री.दिनानाथ भामरे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन प्रा.एम.वाय.चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ.पी.आर.चौधरी, उपाध्यक्ष प्रा.इकबाल मिर्झा डॉ.विजय पाटील ,सचिव राजेश जाधव, मुक्ताईनगर तालुका क्रीडा अधिकारी श्री.नितीन जंगम, मुक्ताईनगर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा ढाके, सचिव श्री.अनिल चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
*राजेश जाधव : सचिव : JDAA.*

