अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.*
![]()
*अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी करणाऱ्या सुषमा चव्हाण यांना कोर्टाचे समन्स.*
अंगणवाडी युनियनचे कार्याध्यक्ष श्री.रामकृष्ण पाटील तसेच युवराज बैसाणे यांची व्हॉट्सअँपवर बदनामी करणारे मॅसेज सुषमा चव्हाण यांनी प्रसारित केले होते.
सदर बदनामीप्रकरणी रामकृष्ण पाटील यांनी ऍड.लक्ष्मण पाटील यांच्या मार्फत श्रीमती सुषमा चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.
परंतु श्रीमती चव्हाण यांनी नोटीसीला प्रतिसाद दिला नाही म्हणून अमळनेर कोर्टात भारतीय दंड विधान कलम 501व माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66,(अ) (ब)(क) प्रमाणे फिर्याद दाखल करण्याची विनंती अर्ज रामकृष्ण पाटील यांनी केला होता.
त्या अनुषंगाने मा.कोर्टाने विनंती मान्य करत सुषमा चव्हाण यांच्या विरुद्ध वरील कलमानुसार न्यायाधीश श्री.एस.एस.अग्रवाल यांनी फौजदारी खटला दाखल करून घेत इशू प्रोसेस करण्याबाबत आदेशीत केले आहे.
बदनामी केल्या प्रकरणी सुषमा चव्हाण यांना मा.कोर्टाने समन्स बजावले असून दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.याप्रकरणी रामकृष्ण पाटील यांच्या बाजूने ऍड.आर. व्ही.निकम हे कामकाज बघत आहेत.


अशा लोकांना प्रेमाची भाषा समजत नाहीं त्यांना कायद्यानेच अद्दल घडवायला पाहिजे. तसेच त्यांना जे प्रोसाहीत करतात त्यांना देखील शिक्षा व्हायला पाहिजे. 🙏