खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश
1 min read

खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश

Loading

खेळाडू वृत्तीने खेळा, विजय तुमचाच – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत संदेश

 

भुसावळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मुलांनच्या १४,१७,१९ वर्षातील तालुका स्तरीय खो-खो स्पर्धांना सुरुवात झाली. सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ चे नायब तहसीलदार संतोष विनंनते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे रोनक मनोज बियाणी यांच्यासह शाळेचे प्राचार्य रुद्रसेन गाठीयां महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे,मुख्याध्यापिका अपर्णा राजपूत, विलास पाटील, वंदना ठोके, यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम उद्घाटक संतोष विनंनते व कार्यक्रमाचे अध्यक्ष रोनक बियाणी यांच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद व मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन व क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले., प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले., स्पर्धेचे उद्घाटक संतोष विनंनते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडूंचे सर्व स्पर्धेत सहभागी होता म्हणून मनःपूर्वक अभिनंदन केले. स्पर्धेत सहभागी झाले हाच आपला विजय आहे असे व खेळाडूनी कुठल्याही संकटाला न डगमगता त्यावरती कणखर बनवून मात करावी.व कार्यक्रमाचे अध्यक्ष रजनीत सावकार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले खेळाडू वृत्तीने खेळून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व जयपराचे आपण पचवावा असे मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून विजय संपादन करावा.असे मनोगतातून सांगितले. सदर स्पर्धेत सर्व गटातील मुलांचे २२संघ / २४४ खेळाडूंनी भाग नोंदविला यात 19 वर्षातील मुलांमध्ये गंगाधर सांडू विद्यालय संघ विजयी झाला, १७ वर्षातील अरुणोदय माध्यमिक विद्यालय बोहर्डी व पंडित नेहरू विद्यालय वराडसीम व बियाणी मिलिटरी स्कूल व महाराणा प्रताप विद्यालय हे संघ सेमी फायनल मध्ये पोहचले, 14वर्षा आतील मुलांचे महात्मा गांधी विद्यालय वरणगाव, महर्षी व्यास विद्यालय वेल्हाळा, महाराणा प्रताप विद्यालय , बियाणी पब्लिक स्कूल मिरगव्हाण चे संघ सेमी फायनल मध्ये पोहचले तर उर्वरित सामने व, मुलींच्या खो-खो स्पर्धा उद्या होतील. पंच म्हणून डॉ प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली, व्ही. एस. पाटील, मुकेश मोरे, अनिल महाजन, लक्ष्मीकांत नेमाडे ,सुनील चौधरी, एन. डी.राजपूत, नरेंद्र म्हस्के, दिलीप सुरवाडे, यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पी.आर. साखरे, रुद्रसेन गाठीयां , तोसीब कुरेशी,यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र बद्ध सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *