अमळनेरात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जंगी सत्कार
![]()
अमळनेरात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा जंगी सत्कार
अंमळनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री शशिकांत शिंदे यांचे अंमळनेर येथे महाविकास आघाडीच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
श्री. शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघ राहून निवडणुकीला सामोरे जाईल. उमेदवारांची निवड स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसारच करण्यात येईल व आम्ही तेच मान्य करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला जिल्ह्याचे निरीक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, महानगराध्यक्ष इजाज भाई मलिक, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, तालुक्याचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत निकम, तसेच महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक पवार यांनी तर आभार प्रदर्शन जाकीर शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


