विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा
1 min read

विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा

Loading

विज्ञान प्रयोगांनी सजला वर्धापन दिन! – मिल के चलो असोसिएशनचा ६ वा वर्धापन दिन करणखेडा विद्यालयात साजरा

अमळनेर प्रतिनिधी
मिल के चलो असोसिएशन, अमळनेर या संस्थेचा 6 वा वर्धापन दिन, विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा ता-अमळनेर जि – जळगाव. जेथे साजरा करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर शंकररराव पवार होते. तर मिलके चलो असोशियशन संस्थेचा 6 वा वर्धापन दिन असल्याने, आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले श्री विवेक सूर्यवंशी सर व श्री चेतन वैराळे सर यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री ए.बी धनगर सर यांनी संस्थेविषयी व कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती दिली.
सत्राच्या आधी मुलांचे मन एकाग्र करण्यासाठी छोटीशी ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. त्यानंतर प्रयोगाला सुरुवात केली. मुलांना डायरेक्ट प्रयोग न दाखवता मुलांना आव्हाने देऊन प्रयोगांचे कारणे विचारून घेतलीत व दाखवलेल्या प्रयोगांची कारण मिमांसा करून त्यांचे निरासन केले. उपस्थित शिक्षक पण प्रयोगाचे कारण जाणून घेण्याचे चांगलाच प्रयत्न करत होते. प्रयोग सिद्ध झाल्यावर मुलाचा प्रतिसाद खूप उत्कृष्ट वाटत होता. प्रत्येक प्रयोगाचे वैज्ञानिक कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. काही मुलांनी स्वतः प्रयोग करून पाहिले व कारणही सांगत होते. ५ वी ते १० वी चें जवळपास एकूण १९७ विद्यार्थी सत्राला हजर होते. प्रयोग झाल्यानंतर मुलांनी सत्राचा अभिप्राय दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए बी धनगर सर यांनी केले तर आभार प्रशांत पाटील सर यांनी मानले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *