ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
1 min read

ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Loading

 

ए.टी. झांबरे विद्यालयातील पोषक पाककृती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगांव प्रतिनिधी

ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत पोषक पंधरवडा या निमित्त दिनांक 9 सप्टेंबर रोजी पोषक पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.इयत्ता 5 वी ते 10 वीच्या 35 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.आपल्याला आवश्यक असलेले घटक जसे की प्रथिने कर्बोदके वसा खनिजे जीवनसत्वे यांपासून बनवलेले खूप चविष्ट असे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले होते.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या बी एड कॉलेज च्या प्राध्यापिका डॉ सौ वंदना चौधरी मॅडम होत्या .त्यांनीच विद्यार्थ्यांना स्वतः कडूनच उत्स्फूर्त पाणे बक्षिसे दिली त्यात प्रथम क्रमांक श्रुती साळुंखे द्वितीय क्रमांक जान्हवी सपकाळे तृतीय क्रमांक सार्थक प्रशांत जळतकर तर उत्तेजनार्थ श्वेता यादव लावण्या चौधरी आणि भार्गवी गाढे यांचा नंबर आला.सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम तसेच पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका सौ पूनम कोल्हे दिपाली खडके रोशनी कोळी यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *