मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन
1 min read

मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

Loading

मराठा आरक्षण जीआर तात्काळ रद्द करा – शिंदखेडा तहसील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे निवेदन

 

शिंदखेडा प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरला तात्काळ रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शारदा बागले यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करत निदर्शनेही करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ओबीसी प्रवर्गामध्ये आधीच २५० पेक्षा अधिक जातींचा समावेश असून, त्यांना अद्याप पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा परिस्थितीत आणखी एक मोठा वर्ग ओबीसीमध्ये समाविष्ट करणे हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय करणारा निर्णय आहे. भारतीय राज्यघटनेत सामाजिक व राजकीय न्यायाची तरतूद असताना शासनाने काढलेला जीआर हा अन्यायकारक असल्याचे मत परिषदेने व्यक्त केले.

नवीन जीआरनुसार मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी आरक्षणावर निवडून येतील. त्यामुळे मूळ ओबीसी बांधवांना राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवले जाईल. परिणामी, ओबीसी समाज फक्त मतदानापुरता शिल्लक राहील, असा सवाल निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच आरक्षणाचा निकष ‘सगे-सोयरे’ किंवा ‘सरसकट’ नसून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असणे हा आहे. या निकषानुसार मराठा समाज पात्र नसतानाही शासनाने जीआर काढल्याचा आरोप समता परिषदेने केला. शासनाने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी या निवेदनातून पुढे आली.

या आंदोलनात गोपाल देवरे (माजी महानगर अध्यक्ष समता परिषद धुळे), सुनील चौधरी (माजी विरोधी पक्षनेता शिंदखेडा नगरपंचायत), दीपक अहिरे (माजी नगरसेवक), दत्तू आबा माळी (माजी सरपंच भडणे), योगेश पांडुरंग (युवक जिल्हाध्यक्ष समता परिषद धुळे), अनिल माळी सर (युवक तालुका अध्यक्ष शिंदखेडा), मुकेश माळी (युवक शहर अध्यक्ष शिंदखेडा), जयेश जाधव (सावता परिषद तालुका अध्यक्ष शिंदखेडा), किशोर माळी, महेंद्र माळी (युवा सेना अध्यक्ष), ईश्वर माळी (ओबीसी जिल्हाध्यक्ष धुळे), भिकन बाविस्कर तसेच ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *