खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा  प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन..
1 min read

खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन..

Loading

खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा

प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला
निवेदन..

अमळनेर प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर येथील फेलो, पेट्रन व व्हाईस-पेट्रन सभासदांची मतदार यादी फोटोसह अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री. राजकुमारजी छाजेड यांनी निविदा भरली असून, मंडळाकडून दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मतदार यादी फोटोसह जाहीर करण्यात येणार आहे.
फोटोसह ही यादी मा. चिटणीस साहेब यांच्या कार्यालयात पाहण्यासाठी ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जे सभासद अद्याप आपले फोटो जमा करू शकले नाहीत त्यांनी तातडीने कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बाबतीत दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या सुमारे २५०० सभासदांच्या फोटोंची तात्पुरती यादी दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत मंडळाच्या कार्यालयात प्रसिद्ध करावी, अशी नम्र विनंती फेलो सभासद प्रसाद शर्मा यांनी अध्यक्ष , मा. उपाध्यक्ष, मा. विश्वस्त मा. कार्याध्यक्ष, मा. उपकार्याध्यक्ष व कार्यकारी सदस्य यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *