अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा
![]()
अमळनेर फार्मसी महाविद्यालयात गणेशोत्सव २०२५ जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा
अमळनेर प्रतिनिधी
प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील खान्देश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृन्द व विद्यार्थी यांचे उत्स्फूर्त सहभागाने भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव २०२५ निमीत्त क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विवीध उपक्रमांचे आयोजन करुन दि. २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
दि.२७ रोजी महाविद्यालयीन कर्मचारी सौ. कविता व श्री हर्षवर्धन शिंपी यांचे शुभहस्ते श्री. गणेशमूर्ती स्थापना करण्यात आली.
दि.२८ रोजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी या सर्वांचा सहभाग असणाऱ्या विवीध संघाच्या साखळीपध्दतीने क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुध्दीबळ इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दि.२९ व ३० रोजी “संस्कृती” या समर्पक उपक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकांकिका, पारंपारिक वेषभूषा, इ. कलाविष्कारांनी आपल्यात असणाऱ्या सुप्त गुणांचे खुप कल्पकतेने सादरीकरण केले. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी श्री. ज्ञानेश्वर चौधरी यांनी देखील नृत्य सादर करुन सर्व प्रेक्षकांना आनंदीत करुन वातावरणात जल्लोष निर्माण केला. खा.शि. मंडळाचे सर्व विद्यमान संचालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रपणे सात्विक भोजनाचा लाभ घेतला आणि विशेष म्हणजे महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री. अनिल महाजन, श्री. सुजित अमळकर, श्री. जगदीश सोनवणे, श्री. जितेन्द्र पाटील, श्री. शिवाजी पाटील, श्री. पंकज पवार, श्री. महेश सोनजे, श्री. प्रकाश पाटील, श्री. किशोर बुलके, श्री.अतुल पाटील, श्री. प्रशांत चौधरी, श्री. कैलास कड, श्री. यश शिंपी, श्री. रोहीत मकवाना व इतर सहकाऱ्यांनी भोजन व्यवस्था सुरळीतपणे हाताळली.
दि.३१ रोजी महाविद्यालयातील शिक्षीका सौ. प्रियांका व श्री. किशोर महाजन साळुंखे यांचे शुभहस्ते श्री. सत्यनारायण भगवान महापूजा करुन विघ्नहर्ता गणपती बाप्पाने असेच आशिर्वाद सदैव देऊन फार्मसी महाविद्यालयाची उज्वल शैक्षणिक परंपरा, सर्व उपक्रम, वर्षानुवर्षे निर्विघ्नपणे पार पडत राहो असे साकडे घालून श्री. विसर्जन केले.
गणेशोत्सव २०२५ चे सुनियोजनासाठी फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन व खा.शि. मंडळाचे विद्यमान संचालक श्री.योगेश मुंदडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे यांनी प्रा. माळी, प्रा. देवेश भावसार, व प्रा. सतिष ब्राम्हणे यांची समन्वयक म्हणून नेमणूक तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रत्येक वर्गातील निवडक विद्यार्थी यांचा समावेश असणाऱ्या विवीध समिती तयार करुन प्रत्येक समितीने करावयाची कामे व जबाबदारी वेळोवेळी सभा घेऊन सर्वांना अवगत करुन नियमीतपणे पाठपुरावा केला. प्रा.देवेश भावसार, प्रा. सतिष ब्राम्हणे व खजिनदार श्री. विनय ब्रम्हे यांनी सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे हाताळून व काटकसरीने खर्चाचे नियोजन केले.
पदवी व पदविका विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेळोवेळी मिळालेले मोलाचे मार्गदर्शन, पदवी व पदविका अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी यांचे अथक परिश्रमांच्या सहकार्याने गणेशोत्सव २०२५ निर्विघ्नपणे, भक्तीमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
खा.शि. मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे चेअरमन श्री योगेश मुंदडे, विद्यमान संचालक श्री. प्रदिप अग्रवाल, श्री. आण्णासाो हरी भिका वाणी, डॉ. अनिल शिन्दे, खा.शि. मंडाळाच्या उपाध्यक्षा श्रीमती माधुरी पाटील, सचिव प्रा. पराग पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन सर या सर्वांनी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पदविका व पदवी विभागातील सर्व विद्यार्थी यांचे यानिमीत्ताने अभिनंदन करुन खान्देश शिक्षण मंडळाची गुणवत्तेची, सुस्कृततेची व एकजूटतेची परंपरा यापुढे अखंडीतपणे सुरु ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

