राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील NPS कपात रकमेचा भरणा अद्यापही प्रलंबित; शिक्षक आर्थिक लाभांपासून वंचित:- समन्वय समितीतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर.
1 min read

राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील NPS कपात रकमेचा भरणा अद्यापही प्रलंबित; शिक्षक आर्थिक लाभांपासून वंचित:- समन्वय समितीतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर.

Loading

राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ/निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र तसेच जिल्ह्यातील NPS कपात रकमेचा भरणा अद्यापही प्रलंबित; शिक्षक आर्थिक लाभांपासून वंचित:- समन्वय समितीतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर.

जळगाव प्रतिनिधी
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी २ जून ते १२ जून २०२५ या कालावधीत वरिष्ठ/निवड श्रेणीसाठीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातील शिक्षकांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले असतानाही, अद्याप प्रशिक्षणाचा निकाल व प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात आलेले नाही.

या विलंबामुळे शिक्षकांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावांवर परिणाम होत असून, शासकीय लाभांपासून हजारो शिक्षक वंचित राहिले आहेत. अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्राविना वरिष्ठ/निवड श्रेणीचा प्रस्ताव सादर करता येत नसल्यामुळे तसेच जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर २०२४ आणि फेब्रुवारी २०२५ या चार महिन्यांमधील NPS (राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना) अंतर्गत कपात केलेली रक्कम अद्याप संबंधित PRAN खात्यांमध्ये जमा झालेली नाही, ही गंभीर बाब उघड झाली आहे.

या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीवर तसेच त्यावर मिळणाऱ्या व्याजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असून, कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

सदर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा यांच्यावतीने मा. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव आणि मा.वेतन अधिक्षक जळगाव. यांना निवेदन देण्यात आले.
या दोन्ही गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव यांच्यावतीने मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात, निकाल व प्रमाणपत्र तातडीने जाहीर करून राज्यभरातील शिक्षकांना लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाची प्रत मा. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांचे मार्फत मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि मा. प्राचार्य, डायट, जळगाव यांनाही देण्यात आली आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी एजाज शेख तसेच माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्ह्याचे समन्वयक श्री तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष पी ए पाटील, मार्गदर्शक डॉ.मिलिंद बागुल, उपाध्यक्ष गोविंदा विश्राम पाटील, महिला प्रतिनिधी सौ सुनीता खडके व श्रीमती सुनीता पाटील, प्रसिद्धीप्रमुख प्रवीण धनगर, कार्यकारणी सदस्य संतोष कचरे, प्रदीप हीरोळे, सचिव सुनील वानखेडे, अनिल चव्हाण, अनिल अहिरे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या या कृतीमुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, प्रशासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *