पु. ल. कट्टा संयोजक श्री रमेश करमकर यांचे दु:खद निधन
1 min read

पु. ल. कट्टा संयोजक श्री रमेश करमकर यांचे दु:खद निधन

Loading

पु. ल. कट्टा संयोजक श्री रमेश करमकर यांचे दु:खद निधन

ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)
मध्य रेल्वे
कामगारांचे ३०–३५ वर्षे युनियन सेक्रेटरी म्हणून लढा देणारे आणि मध्य रेल्वे कर्मचारी पतपेढीत कार्यरत राहून असंख्य कामगारांना मदत करून एक लोकप्रिय कामगार नेता अशी ख्याती मिळवून सेवानिवृत्त झाल्यानंतर कल्याण मधील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पू ल कट्टा कल्याण या संघटनेचे संस्थापक सदस्य होते. पु ल कट्ट्याने आयोजित केलेल्या बालकला संमेलन पोलीस प्रतिभा संमेलन पु ल देशपांडे जन्मशताब्दी उत्सव अशा अनेक मोठमोठ्या उपक्रमात आपले वय विसरून तरुणांच्या बरोबरीने त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे मा. रमेश करमरकर यांचे नुकतेच वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यात अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात मुलगी सुप्रसिद्ध
तबला वादक स्वप्नगंधा करमरकर आणि पत्नी राष्ट्र सेविका समितीच्या स्नेहल करमरकर असे असून,
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लेखन साधनेत स्वतःला झोकून दिले. ‘गुंफियेला शेला’ या पुस्तकाद्वारे त्यांनी आपले संपूर्ण लेखन जतन केले, तर श्री रेणुका कला मंदिरासाठी केलेल्या त्यांच्या लेखनामुळे संस्थेला अभूतपूर्व यश लाभले आहे.
दिनांक 01सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ वाजता त्यांचे गावदेवी चौक येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघून लाल चौकी स्मशान भूमी येथे विद्युत दाहिनी मध्ये त्यांचा अंत्यविधी करण्यात आला त्यांची कन्या स्वप्नगंधा करमरकर यांनी आपले वडिलांच्या चितेला मंत्राग्नी दिला. अंत्यविधी करिता पु ल कट्टा प्रतिनिधी आणि इतर सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे श्री प्रवीण देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण करून शांती मंत्राचे पठण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *