डॉ. दत्ता विघावे यांचे केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओवर थेट मार्गदर्शन
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचे केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओवर थेट मार्गदर्शन
बाभळेश्वर, ता. राहाता :
पर्यावरण संवर्धन आणि देहदान या दोन सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयांवर गत आठ दिवसांत KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओवर डॉ. दत्ता विघावे यांची तज्ञ म्हणून थेट कार्यक्रमांतर्गत उपस्थिती झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारीत होते.
पहिल्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे वैज्ञानिक व सामाजिक पैलू मांडताना डॉ. विघावे यांनी वृक्षलागवड, प्लास्टिकमुक्ती, पाणी संवर्धन व शाश्वत जीवनशैली, नद्यांचे प्रदुषण या बाबींवर सविस्तर माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर जबाबदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच दुसऱ्या कार्यक्रमात त्यांनी देहदानाचे महत्त्व, कायदेशीर प्रक्रिया, सामाजिक गैरसमज, अंधश्रद्धा, घरगुती अडथळा दूर करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. श्रोत्यांनी केलेल्या थेट प्रश्नांना त्यांनी दिलेली समर्पक उत्तरे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या दोन्ही उपक्रमांद्वारे KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओने जनतेपर्यंत वैज्ञानिक व सामाजिक भान पोहोचवण्याचे काम केले. डॉ. विघावे यांचे मार्गदर्शन श्रोत्यांवर प्रभाव टाकणारे व विचारप्रवर्तक ठरले. केव्हीके प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या संचालिका गायत्री म्हस्के यांनी कार्यक्रमाचे अतिशय सुसूत्र व सचोटीने सुत्रसंचलन केले.
क्रिडा, साहित्य, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, महिला सबलीकरण व सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य केलेले पाच विश्वविक्रमांचे धनी असलेले डॉ. दत्ता विघावे यांचे या पूर्वीही रेडिओवर लाईव्ह कार्यक्रम झाले आहेत.

