शिक्षण क्षेत्रातील समन्वयक व पत्रकार उदय नरे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त.
![]()
शिक्षण क्षेत्रातील समन्वयक व पत्रकार
उदय नरे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त.
अमळनेर प्रतिनिधी
हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेतून या शाळेचे पर्यवेक्षक श्री उदय नरे आँगस्ट महिन्यात 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. उदय नरे हे केवळ शिक्षक नसून अनेक वर्ष हे वर्तमानपत्रांमध्ये, प्रसार माध्यमांमध्ये कार्यरत आहे. 1992 पासून श्री नरे हे छायाचित्रकार, पत्रकार म्हणून काम करत होते. प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. गजानन घुर्ये यांचे सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर मुंबई तेहतीस वर्ष त्यांनी शाळेमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे काम केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे हे राज्यपाल नियुक्त अशासकीय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती दोन वेळा करण्यात आली ही त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणता येईल. शिक्षण क्षेत्र हे त्यांचे आवडते क्षेत्र यामुळेच पत्रकार व शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे यांच्याशी विशेष घरोबा. अठरा वर्ष आमदार कपिल पाटील यांच्याबरोबर ते कार्यरत होते. शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत आंदोलन, चर्चा यामध्ये त्यांचा सहभाग असायचा. अनेक वेळा दूरचित्रवाणी व वर्तमानपत्रांमधून त्यांचे लेख व मुलाखती या प्रसिद्ध होत असत. पत्रकारितचेचा पींड असल्याने नियमांच्या चौकटीत बसूनच मुक्त पत्रकार म्हणून काम केले.
मुंबईतील मंत्रालयात एक विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना त्यांच्या लक्षात आले की ग्रामीण भागातील वर्तमानपत्रातील प्रतिनिधी हे मुंबई पर्यंत येऊ शकत नाही आणि जिल्हातील व ग्रामीण भागातील वर्तमानपत्रांना राज्यातील घडामोडी वितंम बातमी मिळणे अशक्य असते. मंत्रालयातील विविध कार्यक्रमांचे फोटो व घडामोडीची वितंमबातमी ग्रामीण भागातील प्रसार माध्यमांना देण्याचे कार्य त्यांनी केले. यामुळेच राज्यातील अनेक पत्रकार, संपादक यांच्याशी संबंध दृढ झाले. लोकसभा असो वा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय विश्लेषक म्हणून अनेकदा त्यांनी आपले मत प्रसारमाध्यमातून अचूकपणे व्यक्त केले. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्यांनी विशेष सलोखा न ठेवल्यामुळेच अनेक राजकीय नेते, पुढारी, मंत्री महोदय यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे अनेकदा अधिकृत बातम्या त्यांना प्राप्त होत असत. पर्यवेक्षक म्हणून काम करत असतानाच कोविड काळात महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षताई गायकवाड यांच्याकडे यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड या स्वतः शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे शिक्षकांची समस्यांचा त्यांना जाण होती. त्यांच्याकडे नेहमीच समस्या घेऊन राज्यातील अनेक शिक्षक व संस्थाचालक मंत्रालयात व त्यांच्या निवासस्थानी येत असत अशावेळी श्री उदय नरे जनसंपर्क अधिकारी म्हणून मंत्री महोदयांच्या पी. एस व विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे घेऊन जात असत शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात अत्यंत तळमळ असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. राजकीय नेत्यांशी असलेल्या सलोखा प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी यांच्याशी ते नेहमी संपर्कात असायचे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी शैक्षणिक समस्येचा मार्ग काढण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व शालेय शिक्षण मंत्री शिक्षक आमदार यांच्यामधील दुवा म्हणून अनेकदा शिक्षक त्यांच्याकडेच पाहत असत. शिक्षण क्षेत्रात असलेल्या शिक्षक सेवकांचा प्रश्न, पायाभूत परीक्षा, पुस्तकांचे ओझे, सेल्फी विथ स्टुडन्ट, परीक्षेचे वेळापत्रक या संदर्भात अनेकदा प्रसारमाध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला.शिक्षण क्षैत्रातील टेलिफोन डिरेक्टरी व एक समन्वयक म्हणून पत्रकार, संपादक व शिक्षक यांच्याशी जिवाभावाचे नाते असलेल्या आत्माराम उर्फ उदय नरे यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी
मराठी लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनाचे विभागीय प्रसिद्धी प्रमुख व
महाराष्ट्र सारथी चे अमळनेर तालुका प्रतिनिधी
ईश्वर महाजन यांनी पुढील वाटचालीस हार्दिक दिल्या आहेत.
ज्ञानदीप प्रज्वलित करत जीवन उजळविले,
विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांचे बी पेरले.
उदय नरे सरांच्या सेवेला शतशः वंदन,
नव्या प्रवासाला आमच्या हार्दिक शुभेच्छा अर्पण. 🌸💐💐💐💐


सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा . आत्ता पत्रकार म्हणून जोमाने काम करता येईल. पुढील आयुष्य आनंदात ,छंद जोपासण्यात जाईल याची पूर्ण खात्री आहे .