सोनार परिवाराचा अभिमान : निर्भय सोनार व जयेश सोनार यशस्वीरीत्या ‘SET 2025’ परीक्षेत उत्तीर्ण
1 min read

सोनार परिवाराचा अभिमान : निर्भय सोनार व जयेश सोनार यशस्वीरीत्या ‘SET 2025’ परीक्षेत उत्तीर्ण

Loading

सोनार परिवाराचा अभिमान : निर्भय सोनार व जयेश सोनार यशस्वीरीत्या ‘SET 2025’ परीक्षेत उत्तीर्ण

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांचा चिरंजीव निर्भय धनंजय सोनार व पुतण्या जयेश संजय सोनार यांनी ‘SET 2025’ परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन “पॉलिटिकल सायन्स” या विषयात असिस्टंट प्रोफेसर (सहा. प्राध्यापक) पदासाठी पात्रता मिळवली आहे.
या यशाबद्दल धनंजय सोनार यांनी सांगितले की, “त्यांचे कठोर परिश्रम, सर्वांचे प्रेम, पाठबळ व सदिच्छा यामुळेच हे यश शक्य झाले.”
साने गुरुजी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, मंगल ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, तसेच शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी निर्भय व जयेश यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *