मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आज गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चार गणेशोत्सव मंडळांच्या आरती सेवा करण्याचा मान
![]()
मा.नगरसेवक विक्रांत पाटील यांना आज गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चार गणेशोत्सव मंडळांच्या आरती सेवा करण्याचा मान
अमळनेर प्रतिनिधी :
गणेशभक्तीने नटलेला गणेशोत्सव आज उत्साहात साजरा होत असून, आज तिसऱ्या (३) दिवशी शहरातील चार गणेशोत्सव मंडळांच्या आरती सेवेलासामाजिक कार्यकर्ते व मा. नगरसेवक विक्रांत पाटील यांनी उपस्थित राहून आरतीचा मान मिळवला.
यामध्ये पानखिडकी येथील सुप्रसिद्ध जय बजरंग गणेशोत्सव मंडळ, भाजीपाला मार्केट गणेशोत्सव मंडळ, प्रभागातील श्रीराम कॉलनी येथील श्रीराम गणेशोत्सव मंडळ तसेच सावतावाडी येथील ओम साईराम गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे.
आरतीच्या वेळी भक्तीगीत, ढोल-ताशांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात वातावरण दुमदुमून गेले. गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे मनापासून स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी विक्रांत पाटील यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा भक्तिभाव, ऐक्य आणि उत्साहाचे प्रतीक असून प्रत्येक गणेशभक्तांच्या सेवेत सहभागी होण्याची संधी ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
शेवटी, गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठ्या उत्सवात केलेल्या स्वागत व सत्काराबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.


