राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे
1 min read

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे

Loading

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मैदानी स्पर्धेचे थाटात उद्घाटन. ( विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल पासून दूर राहून मैदानी खेळ खेळा -मा. नामदार संजय सावकारे.)

भुसावळ -केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट, हा दिवस “मेजर ध्यानचंद” यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाचा आणि जागतिक व्यासपीठांवर देशाला अभिमान वाटणाऱ्या आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी आहे. सन २०२५ या वर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन हा ऑलिंपिक भावना आणि उत्कृष्टता, मैत्री आणि आदर या मूलभूत मूल्यांना भारताची आदरांजली म्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी क्रीडा व युक सेवा संचनालयन महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व क्रीडा विभाग भुसावळ. यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. सदा स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी बियाणी मिलिटरी स्कुल चे संस्थेचे अध्यक्ष मनोज बियाणी ,सचिव डॉ‌ संगीता बियाणी, तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात, शाळेचे प्राचार्य डी एम पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे बी एन पाटील, राजेंद्र कुलकर्णी, तालुका अथलेटिक्स असोसिएशनचे. रवी चोपडे, निकम, यांच्यासह सर्व खेळाडू प्रशिक्षक पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक माननीय नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. दीप प्रज्वलन व क्रीडा ज्योत पेटवून तसेच हवेत बलून सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, मा. ना.संजय सावकारे यांनी खेळाडूंना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून लांब राहून मैदानावरती खेळ खेळले पाहिजे आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे त्यामध्ये मैदानावरती आपल्याला सतत धावावे लागते व चेंडू कडे एकाग्र राहून लक्ष ठेवावे लागते. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उच्च पदावर ती जाता येते. हे मेजर ध्यानचंद , महेंद्रसिंग धोनी अशा विविध खेळांनी दाखवून दिलेले आहे. खेळा करियर म्हणून निवडा व खेळा. सर्वांना स्पर्धेसाठी विजयासाठी व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये 100 मीटर 200 मीटर 400 मीटर 1500 मीटर धावणे ,4×100मी. रिले आदी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे १७ वर्षातील -१००मी. धावणे मुली
शरण्या मनिष भंडारी -प्रथम, वैष्णवी कृष्णा लोहार- द्वितीय, अनन्या मनोज काळे तृतीय , १००मी मुलं कुवरजित निकम प्रथम, योहान फोर्सिलीनो द्वितीय, परवेज तडवी तृतीय, द्वितीय,- २०० मीटर धावणे मुली- अनन्या काळे – प्रथम आरती बारेला- द्वितीय, अनोत्तरा गुरचळ- तृतीय, दोनशे मीटर धावणे मुलं – प्रसाद सोनवणे प्रथम ,पार्थ खाचणे द्वितीय, मनीष ननवरे , तृतीय -४०० मीटर धावणे मुली- सिंड्रेला बॉबी पवार प्रथम, प्रेरणा डांगे द्वितीय, टीना बोंडे तृतीय,४००मी धावणे मुले- कृष्णा राठोड प्रथम, प्रसाद सोनवणे द्वितीय, पार्थ खाचणे तृतीय, १५०० मीटर धावणे मुली इशिका गाडे प्रथम पुरुषमी सोनवणे द्वितीय, सिंड्रेला पवार तृतीय, पंधराशे मीटर धावणे मुलं योगेश कोळेकर प्रथम, ऋषिकेश बानाईत द्वितीय, धर्मपाल सम्यक तृतीय, ४×१००रिले मुलींमध्ये सिंड्रेला बॉबी पवार, इशा घोडके, वैष्णवी लोहार ,अनन्या काळे, प्रथम , तर मुलांमध्ये कुणाल पाटील ,कुवरजित निकम ,सोहम बेंडाळे ,नैतिक चौधरी, प्रथम. खुल्या गटामध्ये १००मी. धावणे महीला – प्रतिज्ञा मनोरे प्रथम, मुलांमध्ये कियार बारेला प्रथम ,कृष्णा राठोड द्वितीय, रितिक जाधव तृतीया, २०० मीटर धावणे पुरुष कियार बारेला प्रथम, यश शिरसाळे द्वितीय, परेश चौधरी तृतीय, १५००मी.पुरुष आदित्य जाधव प्रथम , किरण पाटील द्वितीय , रितिक जाधव तृतीय, ४×१००- रिले पुरुष – यश पगारे प्यार सिंगारे ला पैसा कृष्णा राठोड . प्रथम, करण कोळी प्रेम भटकर सौरभ चौधरी लोकेश कोळी द्वितीय. पंच पंच म्हणून विलास पाटील , हिम्मत पाटील, चन्द्रकांत निकम,
रविन्द्र चोपडे ,
राहुल महाजन,
गोपी सिंह राजपूत,
डेनियल पवार,
ममता जागिंड,
किरण पाटील,
गुडू कुमार गुप्ता,
पुर्वेश सोनवणे,
हिरालाल गौड़,
इरफान शेख,
गौरी लोहार,
सुजल शुक्ला,
सुरेन्द्र पाटील, चव्हाण सर, दत्तू अहिरे, आदींनी काम पाहिले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे भुसावळ तालुका पदाधिकारी यांचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *