विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा
![]()
विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गाजला राष्ट्रीय क्रीडा दिन –देवगाव देवळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धा
अमळनेर प्रतिनिधी
हॉकीचे जनक मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक अरविंद सोनटक्के व स्काऊट शिक्षक एस.के महाजन
यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाचे महत्त्व व खेळ स्पर्धांविषयी मार्गदर्शन केले. यानंतर शाळेत कबड्डी, खो-खो, निंबू चमचा, रस्सीखेच, अशा विविध खेळ स्पर्धा पार पडल्या. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत खेळाचा आनंद लुटला.
कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील, गुरुदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, स्नेहभाव व खेळाडूवृत्ती रुजवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
काही क्षणचित्रे




