आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहा –मंत्री शिरसाट , शिवसेनेच्या बळकटीसाठी अमळनेरात जिल्हा, तालुका व शहर प्रमुखांना दिशा
![]()
आगामी निवडणुकांत भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहा –मंत्री शिरसाट
शिवसेनेच्या बळकटीसाठी अमळनेरात जिल्हा, तालुका व शहर प्रमुखांना दिशा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर नागरित श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा निमित्त राज्याचे मा. ना. श्री संजय जी शिरसाट साहेब मंत्री सामाजिक न्याय विभाग आज रोजी दिनांक 29/8/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता मंगळ मंदिराचे दर्शन घेऊन अमळनेर येथे शिवसेना कार्यालय येथे सदिच्छा भेट प्रसंगी उपस्थिती
शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, महिला शिवसेना जिल्हाप्रमुख सौ सरिता माळी, तालुकाप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख संजय पाटील यांनी माननीय मंत्री महोदय यांच्या शॉल व श्रीफळ देऊन अंमळनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार केला. माननीय मंत्री महोदय यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज करून संघटना वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीवर शिवसेनेच्या भगवा झेंडा फडकवण्यासाठी जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील असे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करण्यात आले. मा. ना. श्री गुलाबरावजी पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. श्री अमोल पाटील अमळनेर तालुक्याचे पालक आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर येणाऱ्या निवडणूक संदर्भात अमळनेर तालुका शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या मेळाव्याचे आयोजन करावे असे आव्हान जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील व सरिता माळी महिला जिल्हाप्रमुख यांनी तालुकाप्रमुख व शहर प्रमुख यांना सूचना केल्या. नवनिर्वाचित महिला तालुकाप्रमुख व शहर प्रमुख यांची माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नवनिर्वाचित तालुकाप्रमुख सुरेखा प्रवीण पाटील ढेकुसिम, शहर प्रमुख चित्रकला प्रकाश महाजन माळीवाडा अंमळनेर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी विक्रांत पाटील माजी नगरसेवक, रवींद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख, भूषण कोळी उप तालुकाप्रमुख, संतोष पाटील उप तालुकाप्रमुख, अमित ललवाणी व्यापारी आघाडी शहर प्रमुख, शोएब शेख अल्पसंख्यांक शहर प्रमुख अनिल पवार, प्रसिद्धी प्रमुख, प्राध्यापक प्रकाश महाजन, रितेश बोरसे, उमाकांत चव्हाण, भूषण पाटील, जितू दुसाने, विजय नवल पाटील, भैय्या धनगर, नरेंद्र पाटील इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही क्षणचित्रे





