विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम
![]()
विज्ञान मेळाव्यात सार्वजनिक विद्यालयाची मोहिनी पाटील प्रथम
जळगांव प्रतिनिधी
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये ‘क्वाँटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाची कु. मोहिनी पाटील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. हा मेळावा या.दे. पाटील माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे आयोजित करण्यात आला व यामध्ये तालुक्यातील 35 शाळा सहभागी झाल्या होत्या.
2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने जागतिक क्वाँटम वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवल आहेत. दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस जागतिक क्वाँटम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने ‘क्वाँटम युग संभाव्यता व आव्हाने’ या विषयावर अखिल भारतीय विज्ञान मेळावा घेण्यात आला. तालुकास्तरीय पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल मोहिनी भरत पाटील हिचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते व पर्यवेक्षक एल. जे. पाटील, विज्ञान समितीप्रमुख प्रेमराज बऱ्हाटे , गोपाळ महाजन, प्रशांत कोल्हे उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन, संस्थेचे सचिव विलास चौधरी सर्व संचालक मंडळ यांनी मोहिनी पाटील चे अभिनंदन केले.

