संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा – श्रद्धा, भक्ती व समर्पणाचा संगम  अमळनेरात गजानन महाराज मंदिर परिसरात पारायण, अभिषेक व महाप्रसादाने दुमदुमले वातावरण
1 min read

संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा – श्रद्धा, भक्ती व समर्पणाचा संगम अमळनेरात गजानन महाराज मंदिर परिसरात पारायण, अभिषेक व महाप्रसादाने दुमदुमले वातावरण

Loading

संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा – श्रद्धा, भक्ती व समर्पणाचा संगम

अमळनेरात गजानन महाराज मंदिर परिसरात पारायण, अभिषेक व महाप्रसादाने दुमदुमले वातावरण

 

 

 

 

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने अभिषेक, माळजप, अध्याय सामूहिक पारायण वाचन (१९ वा व २१ वा अध्याय), लघुरुद्र अभिषेक, सामूहिक आरती तसेच महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात सामूहिक पारायण वाचनाचे नेतृत्व महिला वारी प्रमुख व संत गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त ज्योतीताई पवार यांनी केले. लघुरुद्र अभिषेक हा धार्मिक विधी अशोक भावे महाराज व नितीन भावे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या प्रसंगी संत गजानन महाराज सेवा संस्थानचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार, मंदिराचे पुजारी रघुनाथ पाटील तसेच शहरातील अनेक गजानन भक्त व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर समाधी सोहळ्यानिमित्त सर्व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या धार्मिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संत गजानन परिवारातील सर्व महिला भगिनी व बांधवांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण सोहळा अत्यंत भक्तिमय, खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न झाला व उपस्थित भक्तांनी श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कृतार्थ झाल्याची अनुभूती व्यक्त केली.
आज अनेक गजानन भक्त व भाविकांनी शहरातील व तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित संत गजानन महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथी कार्यक्रमांनिमित्त महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *