मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट
![]()
मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर येथे कै. गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित पुरस्कार प्राप्त कार्यक्रमात अचलपूरचे माजी आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे दोघांमधील जुने मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.
या प्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. सध्याच्या राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवरही विशेष प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांची पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना पाटील, मारवड संस्थेचे अध्यक्ष जयवंत आबा पाटील, परिश्रम मतिमंद विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन, माजी नगरसेवक हिम्मत देसले, कोळी समाजाचे अध्यक्ष मधुकर सोनवणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते शरद पाटकरी, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप बोरसे, सावता माळी मित्र मंडळाचे अध्यक्ष भूषण महाजन, समर्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष पंकज वाघ, हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी भामरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील व सौ. स्वप्नताई पाटील यांनी मा. बच्चुभाऊ कडू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या वातावरणात आत्मीयता व आपुलकीचा भाव स्पष्टपणे जाणवत होता.




