अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण
![]()
*अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे*
पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण
जळगांव प्रतिनिधी
ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक विषयी जनजागृती या विषयावर पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण शहर वाहतूक शाखा जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे पालन करताना कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच हेड कॉन्स्टेबल सचिन सोनवणे यांनी सायबर गुन्हे कसे होतात सोशल मीडिया वरती अकाउंट बनवून कशा पद्धतीने फसवले जाते आणि विद्यार्थी याला कसे बळी पडतात याविषयीचे मार्गदर्शन केले.तर हेड कॉन्स्टेबल स्वाती पाटील यांनी महिला अत्याचार याबाबतीत मुलींना सजग राहण्यासंदर्भात सूचना दिल्या. आपले वागणे बोलणे आपण कसे ठेवले पाहिजे तसेच जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर त्याविषयी लगेच सांगितले पाहिजे याबरोबरच गुड टच आणि बॅड टच याविषयीचे सुद्धा माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक मोरे यांनी केले.

