कल्याण येथे कियान स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे उत्कृष्ट खो खो संघांचा गुणगौरव सोहळा संपन्न.  *क्रीडा संघटक कृष्णा माळी यांचे कार्य खेळाडू क्रीडाव शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.::भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षण योगेश मोरे यांचे प्रतिपादन.*
1 min read

कल्याण येथे कियान स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे उत्कृष्ट खो खो संघांचा गुणगौरव सोहळा संपन्न. *क्रीडा संघटक कृष्णा माळी यांचे कार्य खेळाडू क्रीडाव शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.::भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षण योगेश मोरे यांचे प्रतिपादन.*

Loading

कल्याण येथे कियान स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे उत्कृष्ट खो खो संघांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

*क्रीडा संघटक कृष्णा माळी यांचे कार्य खेळाडू क्रीडाव शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.::भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षण योगेश मोरे यांचे प्रतिपादन.*

( *१: प्रथम क्रमांक:बी.के.बिर्ला महाविद्याल २८२० गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत्याबद्दल चषक आणि २०,००० रोख बक्षीस.
२) द्वितीय क्रमांक: डॉन बॉस्को स्कूल चा संघाने २६८० गुणांसह दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल चषक व १५,००० रोख बक्षीस
३) तृतीय क्रमांक:मॉडेल कॉलेज ने ९८० गुणांसह तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल चषक व १०,००० रोख बक्षीस.देऊन गौरव करण्यात आला.)
*
ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत, 2024/ 25 या शैक्षणिक वर्षात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाच्या व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेणारे क्रीडा प्रशिक्षक शिक्षक बंधू भगिनींच्या गुणगौरव सोहळा कल्याण येथील कियान स्पोर्ट्स चे संचालक, कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी तन-मन-धनाने सदैव क्रीडा शिक्षकांच्या मदतीसाठी तत्पर असणार उत्कृष्ट क्रीडा संघटक कृष्णा माळी यांनी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू तसेच भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षक योगेश मोरे साहेब यांचा अध्यक्षतेखाली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे साहेब यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले.बी.के. बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व कल्याण मुली महानगरपालिकेचे क्रीडा समिती सदस्य डॉ. यज्ञेश्वर बागराव, के.एम.अग्रवाल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, व क्रीडा स्पर्धा कोणतीही असो ती यशस्वी करण्यासाठी सदैव तत्पर असलेले क्रीडा समिती सदस्य डॉ. विजय सिंग सर, कल्याण डोंबिवली क्रीडा समितीचे सदस्य श्री. गजानन वाघ, जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा यशस्वी करणारे कृष्णा बनगर, उत्कृष्ट कबड्डी संघटक शेजवळ सर, डॉन बॉस्को शाळेचे ट्रस्टी जॉन सर, कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजन समिती सदस्या सौ. रेणुका पिसे मॅडम, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा स्पर्धांचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, प्रा.चिंतामण पाटील, प्रा.सुभाष गायकवाड,जितेंद्र सोनवणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत, कल्याण पश्चिम येथील सावळाराम फील्ड टर्फ भोईरवाडी येथे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू भारतीय रेल्वे चे खो.खो. प्रशिक्षक योगेश मोरे व डॉ. यज्ञेश्वर बारगाव आणि क्रीडा समिती सदस्य व क्रीडा शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सिद्धेश्वर बारगाव यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण कोणालाही हरवण्यासाठी स्पर्धा करायची नसते तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने खेळ खेळायचा असतो. प्रत्येक खेळाडूने परस्पर संघभावना जोपासली पाहिजे तरच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे सांगितले. कियान स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे स्तुत्य आणि प्रेरणादायी असा उपक्रम प्रथमच कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हास्तरीय खेळाडूंच्या गुणगौरव तसेच क्रीडा शिक्षकांच्या गुणगौरव करून कृष्णा माळी सरांनी खेळाडू व क्रीडा शिक्षकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. डॉन बॉस्को शाळेचे संचालक जॉन सर यांनीही क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम म्हणजे प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट आहे अशा कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा व त्यासाठी आमचेही योगदान राहील असे सांगितले. प्रा. चिंतामण पाटील यांनीही याप्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे देखील प्रत्येक विजयी संघाला ट्रॉफी स्पर्धा संपल्याबरोबर मिळावी म्हणजे विजयी खेळाडूंना शाळेत गेल्याबरोबर एक वेगळा आनंद व्यक्त करता येतो असे सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे साहेब यांनी कृष्णा माळी सरांचा कार्याच्या गौरव करत सांगितल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी कृष्णा माळी सरांचे मोलाचे योगदान आहे. आणि आगामी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत स्पर्धा संपल्याबरोबर विजयी संघांना सन्मानचिन्ह व मेडल देऊन क्रीडांगणावरच गौरव करण्यात येईल. असे सांगितले तसेच यावर्षी क्रीडा दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांच्या देखील गुणगौरव करण्यात येईल असे आश्वासन दिले.
कल्याणमधील बी.के. बिर्ला कॉलेज चा संघाने क्रीडा प्रशिक्षक प्रा.चिंतामण पाटील व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा समितीचे सदस्य, बिर्ला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ यज्ञेश्वर बारगाव यांच्या मार्गदर्शनाखाली २८२० गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत्याबद्दल चषक आणि २०,००० रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कल्याण पश्चिम मधील डॉन बॉस्को स्कूल ने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा आयोजन नियोजन समिती सदस्या सौ.रेणुका पिसे यांचा डॉन बॉस्को स्कूल चा संघाने २६८० गुणांसह दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल चषक व १५,००० रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.मॉडेल कॉलेजचे उत्कृष्ट क्रीडा संघटक प्रा.सुभाष गायकवाड यांना नेतृत्वात मॉडेल कॉलेज ने ९८० गुणांसह तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल चषक व १०,००० रोख बक्षीस.देऊन गौरव करण्यात आला.अशा प्रतिष्ठित कार्यक्रमात क्रीडाशिक्षक आणि खेळाडू विद्यार्थी या दोघांनाही प्राधान्य दिले. आमच्या माहितीनुसार,महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबवला जात आहे आणि आम्ही तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाचे मनापासून कौतुक करतो. आम्हाला आशा आहे की अधिकाधिक शिक्षक आणि लोकनेते कृष्णा माळी सरांचा प्रेरणादायी उपक्रमाचा आदर्श समोर ठेऊनप्रेरित होतील आणि त्यांच्या संबंधित प्रदेशात असेच उपक्रम पुढे नेतील. महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी आणि भारताच्या क्रीडा विकासासाठी अशा प्रकारचे प्रयत्न आवश्यक आहेत. अश्या शब्दात आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू , भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षक योगेश मोरे यांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सुहास पंजे, प्रा.दिनेश थळे,तसेच कियान स्पोर्ट्स अकॅडमी चे सर्व सहकारी यांनी विशेष सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ठाकरे सर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवर खेळाडू व पालक वर्गाचे प्राध्यापक चिंतामण पाटील यांनी आभार व्यक्त केले.राष्ट्रगीतानंतर अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *