कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप
1 min read

कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप

Loading

 

कै. श्रीराम  गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :
आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे यांच्या ८व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सकाळी त्यांच्या समाधीस्थळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दादासाहेब संजय सोनवणे व संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूसाहेब विजय सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी संस्थापकांच्या कार्यकर्तृत्वाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे महान कार्य आण्णांनी केले. याच शाळेतून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत हीच त्यांची खरी संपत्ती आहे.
या कार्यक्रमाला गावातील नागरिक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आण्णांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत विशेष जेवण म्हणून जिलेबीचे वाटप करण्यात आले.
आण्णांचे कार्य हे आजही प्रेरणादायी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या त्याग, परिश्रम आणि दूरदृष्टीतूनच आज संस्था भक्कमपणे उभी आहे व हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे. असा मान्यवरांच्या तोंडून सूर व्यक्त झाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *