साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात 
1 min read

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात 

Loading

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) –
साने गुरुजींच्या कार्यभूमीत सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्याच धाग्याला अनुसरून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “मूर्तीकार व्हा” ही आगळीवेगळी कार्यशाळा शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी स्मारकाच्या परिसरात उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेत बालकुमारांबरोबरच पालक आणि प्रौढ सहभागीही मातीशी एकरूप होताना दिसले. मातीची साक्षात गणेशमूर्ती घडविताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य खुलले. माती बरोबर खेळण्याचा आनंद लहानग्यांनी आणि मोठ्यांनी मनसोक्त लुटला.
या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून डॉ. लिना चौधरी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सूक्ष्म मार्गदर्शनाखाली उपस्थित सर्वांनी सुबक व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या.
कार्यक्रमाचे स्वागत तुषार पाटील यांनी केले तर कार्यशाळेचे उत्तम संचलन दर्शना पवार यांनी केले. पावसाळा व पोळा सण असूनही कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
सहभागींमध्ये कबीर पाटील, डॉ. राखी माळी, भार्गवी देसले, समृद्धी देसले, अमृता पाटील, मायरा, राम, ओम, रोहित सोनार, मल्हार, तेजस, प्रथमेश चौधरी, संदीप घोरपडे, सुनिल पाटील, तुषार पाटील, दर्शना पवार, अतूल चौधरी यांसह अनेकांनी आपल्या सहभागाने कार्यशाळेला यश दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

One thought on “साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे “मूर्तीकार व्हा” कार्यशाळा उत्साहात 

  1. अतिशय सुंदर उपक्रम !🌹🌹🌹👏👏👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *