असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा
1 min read

असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा

Loading

असोदा येथे शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा

“मातीशिवाय कष्टाला आणि शेती शिवाय बैलाला पर्याय नाही”. शेतकऱ्याची खरी दौलत त्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांमुळेच असते. असोदा येथे सार्वजनिक विद्यालयात शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला बैलपोळा सण प्रत्यक्ष कृतीद्वारे साजरा करण्यात आला. विद्यालयातील यश पाटील व वैभव येवले या दोघांनी त्यांचे बैल छान सजवून शाळेत आणले. तर देवयानी कोळी ललिता कोळी सारिका चौधरी देवयानी कोळी भाग्यश्री कोळी श्रद्धा निकम या विद्यार्थिनींनी बैलांना औक्षण करून पुरणपोळी खाऊ घातली.
तसेच गावातील शेतकरी जनार्दन चौधरी हे देखील आवर्जून बैलांसोबत उपस्थित राहिले. देवयानी कोळी हिने बैलपोळा या सणाविषयी माहिती सांगितली तसेच किरण तायडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली आपल्या वक्तव्यातून बैलांविषयीचा आणि शेतकऱ्या विषयी आदर व्यक्त केला. डिंपल नारखेडे व तिच्या मैत्रिणी यांनी आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी ह्या गीतावर नृत्य सादर करून बळीराजाच कौतुक केलं. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी अध्यक्षीय मनोगतातून बैल हे श्रम आणि कष्टाचे प्रतिक असून शेतकऱ्यांच्या मदतीला, सोबतीला असणारा बैल शेतकऱ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देत असतो असे सांगितले कार्यक्रमाला पर्यवेक्षक लालसिंग पाटील, मंगला नारखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना चौधरी यांनी तर आभार शुभांगीनी महाजन यांनी मानले. सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *