ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय  🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम  🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद
1 min read

ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय 🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम 🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद

Loading

ग्रामविकास शिक्षण संस्थेत मोठा निर्णय

🔹 डी. सी. पाटीलच मुख्याध्यापक प्रतिनिधी कायम

🔹 जिजबराव बागल यांची नियुक्ती अवैध; कर्मचाऱ्यांत आनंद

अमळनेर प्रतिनिधी 
अमळनेर तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण संस्था, मूडी येथे सुरु असलेला मुख्याध्यापक प्रतिनिधी पदाचा वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये डी. सी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र ते 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाल्याने, कार्यकारिणीने घटना नियम क्र. 8 चा आधार घेत पदावरून काढून टाकत जिजबराव विठ्ठल बागल यांची नियुक्ती केली. अध्यक्षांनी त्याबाबत फेरफार अर्ज क्र. 885/2024 दाखल केला होता.

डी. सी. पाटील यांनी मांडलेल्या युक्तिवादात –

“घटनानियमाचा गैरअर्थ काढून मला द्वेषापोटी हटवले गेले.”

“पूर्वी तीन मुख्याध्यापक प्रतिनिधी सेवा निवृत्तीनंतरही कायम राहिले होते.”

“जिजबराव बागल हे कर्मचारी सभासद नसल्याने त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे.”

या सर्व बाबींचा विचार करून म. उपधर्मादाय आयुक्त, जळगाव यांनी ठरवले की, “व्यवस्थापन समितीतील रिक्त जागा कायदेशीररीत्या निर्माण झालेली नाही; त्यामुळे नियुक्ती अवैध आहे.” परिणामी, फेरफार अर्ज नामंजूर झाला व पाटील यांचे पद कायम ठेवण्यात आले.

या निर्णयानंतर संस्थेतील कर्मचारी व शिक्षक वर्गात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *