अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन
![]()
अमळनेर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा… ‘कभी खुशी, कभी गम’ चे दर्शन
अमळनेर प्रतिनिधी :
शेतकरी बांधवांचा कृतज्ञतेचा आणि आनंदाचा सण असलेला बैलपोळा अमळनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्वच गावांत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून, आकर्षक सजावट करून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या. महिलांनी झिम्मा-फुगडी खेळून वातावरण अधिकच रंगवले.
या वर्षी वरुणराजा ही प्रसन्न झाला असून चांगल्या पावसामुळे शेतकरी आनंदी आहेत. मात्र काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि चिंता असे ‘कभी खुशी, कभी गम’ चे चित्र एकाचवेळी दिसून आले.
बैलांना पुरणपोळी, गूळ-भाकरीचा नैवेद्य दाखवून शेतकऱ्यांनी आपल्या या कष्टकरी सोबत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गावोगावी पारंपरिक खेळ, भजन, कीर्तन तसेच सामूहिक जेवण यामुळे पोळ्याचा उत्सव सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला.
फोटो कँप्शन
अमळनेर येथील कृषीभूषण कविश पाटील यांच्या “सर्जा राजा” बैलाचा बैलपोळ्याच्या पूजन सोहळ्यात जोडी

