संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या स्पर्धा : अमळनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव
![]()
संस्कृतीचे मूल्य जपणाऱ्या स्पर्धा : अमळनेरमध्ये अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव
अमळनेर प्रतिनिधी- येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट व महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त निबंध स्पर्धा व 2 मिनीट शो या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील यशस्वितांचा गुणगौरव करण्यात आला.
महिला मंच ट्रस्टचे अध्यक्षा डाॅ.अपर्णा मुठे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप घोरपडे, कार्याध्यक्ष रमेश पवार, महिला मंच ट्रस्टचे सेक्रेटरी सरोजताई भांडारकर, कोषाध्यक्ष कांचनताई शहा, प्रकल्प प्रमुख वसुंधरा लांडगे, प्रा.शीला पाटील, संचालक उज्वलाताई शिरोडे, प्रा.रंजनाताई देशमुख, विद्याताई हजारे, माधुरीताई पाटील, ‘मसाप’ चे प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यवाह विजया गायकवाड, कोषाध्यक्ष उमेश काटे, संचालक नरेंद्र निकुंभ, शरद पाटील, मनोहर नेरकर आदी उपस्थित होते. वसुंधरा लांडगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा रंजना देशमुख यांनी आभार मानले. दरम्यान या उपक्रमांतर्गत येथील द्रौ.रा.कन्या शाळा येथे तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्य’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर येथील जिजाऊ जिम येथे विवाहित महिलांसाठी ‘मी अहिल्या बोलते’ या विषयावर ‘२ मिनीट शो स्पर्धा’ घेण्यात आली. यात अनेक महिलांनी अहिल्यादेवींसारखा पेहेराव करून २ मिनिटांचे सादरीकरण केले. या स्पर्धांमुळे महाविद्यालयीन युवती व महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळाला. त्यामुळे या विशेष उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशाच पद्धतीचे उपक्रम तालुक्यात राबवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
स्पर्धेचा निकाल असा
प्रथम – भावना समाधान सोनवणे (सावित्रीबाई फुले विद्यालय, अमळनेर), द्वितीय – यामिनी तुकाराम माळी (पं.नेहरू समाजकार्य, देवळी), तृतीय – रमा संजय चव्हाण (प्रताप काॅलेज, अमळनेर) यावेळी परीक्षक म्हणून उमेश काटे व शरद पाटील यांनी काम पाहिले.
“मी अहिल्या बोलते” 2 मिनीट शो स्पर्धा
प्रथम- नयना कुलकर्णी, द्वितीय- माधुरी प्रशांत पाटील, तृतीय- आरती रेजा, उत्तेजनार्थ- अलका पाटील. यावेळी परीक्षक म्हणून रेखा सोनी व राजू शहा यांनी काम पाहिले.
——
फोटो कँप्शन
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थिनी व महिलांसमवेत डॉ. अपर्णा मुठे, संदीप घोरपडे, कवी रमेश पवार व मान्यवर

