अमळनेरमध्ये उदया रंगणार “यादों की महफिल”
1 min read

अमळनेरमध्ये उदया रंगणार “यादों की महफिल”

Loading

अमळनेरमध्ये उदया रंगणार “यादों की महफिल”

अमळनेर प्रतिनिधी-ईश्वर महाजन) – शहरातील संगीतप्रेमींसाठी सुरेल गीतांची पर्वणी रंगणार आहे. किशोर देशपांडे प्रस्तुत स्वरांजली म्युझिकल ग्रुप, अमळनेर तर्फे “यादों की महफिल” हा बहारदार संगीत सोहळा शनिवार, दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता इंदिरा भवन, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात शहरातील गुणी कलाकार आपले गोड स्वर रसिकांच्या मनात रुंजी घालतील. गायकांमध्ये
🎤 श्री. मिलिंद पाटील
🎤 श्री. देविदास बिरारी
🎤 श्री. प्रदीप शिंगाणे
🎤 सौ. नेहा देशपांडे
🎤 सौ. युगछाया शिंगाणे
🎤 सौ. विद्या पाटील
🎤 सौ. पुनम अग्रवाल
🎤 प्रा. श्री. रविंद्र माळी (फार्मसी महाविद्यालय)

हे सर्व कलाकार जुन्या-नव्यांच्या अविस्मरणीय हिंदी सिनेगीतांची मैफल सजवणार आहेत. खास बाब म्हणजे हा निशुल्क कार्यक्रम असून रसिकांनी सहकुटुंब व मित्र परिवारासह उपस्थित राहून संगीतमय वातावरणाचा आनंद घ्यावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *