स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन व संत ज्ञानेश्वर जयंती साजरी
1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन व संत ज्ञानेश्वर जयंती साजरी

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद्घाटन व संत ज्ञानेश्वर जयंती साजरी

जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर यांची ७५० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पसायदानाचे सामूहिक गायन केले. प्रा. रूपम निळे यांनी पसायदान गायन केले. तर प्रा.संध्या महाजन यांनी पसायदानाचा अर्थ स्पष्ट करून दिला. तसेच संत ज्ञानेश्वरांचे चरित्र श्रोत्यांना उलगडून सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यिक कार्याचा गौरव केला. यावेळी पर्यवेक्षक प्रा.स्वाती बऱ्हाटे , समन्वयक प्रा.उमेश पाटील, प्रा. संदीप वानखेडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाड्मय मंडळ प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा.दीपक चौधरी यांनी मानले. यावेळी संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा व ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अर्जुन मेटे, डॉ.रणजीत पाटील, प्रा.ईशा वडोदकर, डॉ.अतुल इंगळे, डॉ .जयंत इंगळे, प्रा.प्रवीण महाजन, प्रा.विनोद वैदकर प्रा. एकता कवटे, प्रा.उमेश ठाकरे, प्रा.संदीप गव्हाळे, श्री.विजय जावळे, श्री.अजय काळे, श्री.चेतन वाणी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *