मसाप’ तर्फे 20 ऑगस्टपासून भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान  प.पू. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान
1 min read

मसाप’ तर्फे 20 ऑगस्टपासून भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान प.पू. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान

Loading

‘मसाप’ तर्फे 20 ऑगस्टपासून भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान

प.पू. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने विशेष व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा अमळनेर यांच्या वतीने भारतीय संतांच्या विचारांचा परिचय व्हावा या उद्देशाने वर्षभर प्रत्येक एकादशीच्या दिवशी “भारतीय संतांच्या विचारांचा जागर अभियान” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ प.पू. संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने उद्यापासून (ता. 20) येथील वाडी चौकातील संत सखाराम महाराज सभागृहातून सकाळी 11 ला होणार आहे. प्रमुख वक्ते मनोहर खोंडे हे “संत सेना महाराज यांचे जीवन कार्य” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी राहतील. समन्वयक म्हणून भारती सोनवणे तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष उमेश काटे हे सूत्रसंचालन करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष रमेश पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कार्यवाह विजया गायकवाड, कोषाध्यक्ष उमेश काटे व संचालक मंडळांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *